IPL 2020 : सूर्याचं निवड समितीला पुन्हा उत्तर, धमाकेदार खेळीसह विक्रमाची नोंद

IPL 2020 : सूर्याचं निवड समितीला पुन्हा उत्तर, धमाकेदार खेळीसह विक्रमाची नोंद

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)ने जबरदस्त कामगिरी केली आहे.

  • Share this:

दुबई, 5 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)ने जबरदस्त कामगिरी केली आहे. मुंबई (Mumbai Indians)च्या या आक्रमक बॅट्समनने यावर्षी 15 मॅचमध्ये 41.90च्या सरासरीने आणि 148.23 च्या सरासरीने 461 रन केले, यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल प्ले-ऑफच्या दिल्ली (Delhi Capitals)विरुद्धच्या मॅचमध्ये सूर्यकुमारने 38 बॉलमध्ये 51 रन केले. या अर्धशतकीय खेळीसोबतच सूर्याने निवड समितीला त्याच्या बॅटने पुन्हा एकदा उत्तर दिलं आहे. याचबरोबर सूर्यकुमार यादवने आयपीएलच्या इतिहासात नवा विक्रमही नोंदवला आहे.

2 हजार रन करणारा अनकॅप खेळाडू

सूर्यकुमार यादवच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. याचसोबत सूर्याच्या नावावर आयपीएलमध्ये 100 मॅचमध्ये 2009 रन झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळता 2 हजार रन पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. याचसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळता 100 आयपीएल मॅच खेळण्याचा रेकॉर्डही सूर्यकुमार यादवने केला आहे. सूर्यकुमार 2012 सालापासून आयपीएल खेळत आहे. आतापर्यंत त्याने 30.43 ची सरासरी आणि 135.37 च्या स्ट्राईक रेटने 2 हजारपेक्षा जास्त रन केले आहेत. या कारकिर्दीमध्ये त्याने 11 अर्धशतकं केली, यातली 4 अर्धशतकं याच मोसमातली आहेत.

मागच्या 3 आयपीएल मोसमात सूर्यकुमारने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. 2018 साली सूर्यकुमारने 14 मॅचमध्ये 512 रन केले, तर मागच्या मोसमात त्याने 16 मॅचमध्ये 424 रन केले होते.

आयपीएलसोबतच स्थानिक क्रिकेटमध्येही सूर्यकुमारने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यानंतरही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या भारतीय टीममध्ये त्याची निवड झाली नाही. त्यामुळे अनेक चाहत्यांनी आणि माजी क्रिकेटपटूंनी निवड समितीवर टीका केली.

Published by: Shreyas
First published: November 5, 2020, 10:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या