दुबई, 2 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या आजच्या मॅचमध्ये हैदराबाद (Sunrisers Hyderabad)चा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. हैदराबादने त्यांच्या टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत, तर धोनी (MS Dhoni)ने मात्र चेन्नई (Chennai Superkings)मध्ये 3 खेळाडू बदलले आहेत.
चेन्नईच्या टीममधून मुरली विजय, ऋतुराज गायकवाड आणि जॉस हेजलवूडला वगळण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी अंबाती रायुडू, ड्वॅन ब्राव्हो आणि शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. मुंबईविरुद्धची पहिली मॅच खेळल्यानंतर अंबाती रायुडू दुखापतग्रस्त झाला होता, तर ब्राव्होला दुखापतीमुळे एकही मॅच खेळता आली नव्हती.
आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम सध्या शेवटच्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत खेळलेल्या 3 मॅचपैकी 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर मुंबईविरुद्धची मॅच जिंकण्यात चेन्नईला यश आलं. दुसरीकडे हैदराबादच्या टीमचाही 2 मॅचमध्ये पराभव आणि एका मॅचमध्ये विजय झाला. चेन्नईपेक्षा नेट रनरेट चांगला असल्यामुळे हैदराबाद 7व्या क्रमांकावर आहे.
चेन्नईची टीम
शेन वॉटसन, अंबाती रायुडू, फाफ डुप्लेसिस, केदार जाधव, एमएस धोनी, ड्वॅन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकूर, पियुष चावला, दीपक चहर
हैदराबादची टीम
डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, मनिष पांडे, केन विलियमसन, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, टी नटराजन