मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : हैदराबादच्या बॅट्समनचा संघर्ष, राजस्थानला 159 रनचं आव्हान

IPL 2020 : हैदराबादच्या बॅट्समनचा संघर्ष, राजस्थानला 159 रनचं आव्हान

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमातला लागोपाठ पाचवा पराभव टाळण्यासाठी राजस्थान (Rajasthan Royals) ची टीम मैदानात उतरत आहे.

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमातला लागोपाठ पाचवा पराभव टाळण्यासाठी राजस्थान (Rajasthan Royals) ची टीम मैदानात उतरत आहे.

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमातला लागोपाठ पाचवा पराभव टाळण्यासाठी राजस्थान (Rajasthan Royals) ची टीम मैदानात उतरत आहे.

  • Published by:  Shreyas

दुबई, 11 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या आजच्या सामन्यात हैदराबाद (Sunrisers Hyderabad)च्या बॅट्समनना संघर्ष करावा लागला. 20 ओव्हरमध्ये हैदराबादने 4 विकेट गमावून 158 रन केले. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 35 रन आल्यामुळे हैदराबादला या धावसंख्येपर्यंत पोहोचता आला. हैदराबादकडून मनिष पांडेने सर्वाधिक 54 रन केले, तर डेव्हिड वॉर्नर 48 रन करून आऊट झाला. केन विलियमसनने 12 बॉलमध्ये नाबाद 22 रन केले. जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी आणि जयदेव उनाडकटला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

यंदाच्या मोसमातला लागोपाठ पाचवा पराभव टाळण्यासाठी राजस्थान (Rajasthan Royals) ची टीम मैदानात उतरली आहे. या मॅचमध्ये हैदराबाद (Sunrisers Hyderabad) ने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. राजस्थानच्या टीममध्ये ऑलराऊंडर बेन स्टोक्सचं आगमन झालं आहे. या मॅचमध्ये राजस्थानने टीममध्ये 4 बदल केले आहेत. एन्ड्रू टाय, यशस्वी जयस्वाल, वरुण ऍरोन आणि महिपाल लोमरोर यांना डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी बेन स्टोक्स, रॉबिन उथप्पा, जयदेव उनाडकट आणि रियान पराग यांना संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे हैदराबादच्या टीमनेही एक बदल केला आहे. अब्दुल समदच्या जागी विजय शंकरचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम सातव्या क्रमांकावर आहे. राजस्थानने आतापर्यंत खेळलेल्या 6 मॅचपैकी 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला, तर दोनच मॅच त्यांना जिंकता आल्या आहेत. दुसरीकडे हैदराबादने 6 पैकी 3 सामने जिंकले, तर 3 सामने गमावले आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची टीम पाचव्या क्रमांकावर आहे.

राजस्थानची टीम

जॉस बटलर, स्टिव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी

हैदराबादची टीम

डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, केन विलियमसन, मनिष पांडे, विजय शंकर, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, राशिद खान, संदीप शर्मा, खलील अहमद, टी नटराजन

First published: