Home /News /sport /

IPL 2020 : बॉलिंग टाकायला परवानगी, तरी नारायणला का खेळवलं नाही? मॉर्गन म्हणतो...

IPL 2020 : बॉलिंग टाकायला परवानगी, तरी नारायणला का खेळवलं नाही? मॉर्गन म्हणतो...

IPL 2020 सुनिल नारायण (Sunil Narine) च्या बॉलिंग ऍक्शनवरचे आक्षेप मिटल्यानंतरही त्याला कोलकाता (KKR) आणि हैदराबाद (SRH) च्या मॅचमध्ये संधी मिळाली नाही. कोलकात्याचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) याने याबाबतचं कारण सांगितलं आहे.

    अबु धाबी, 19 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या 35व्या मॅचमध्ये कोलकाता (KKR)ने हैदराबाद (SRH)चा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. या मॅचमध्ये हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. हैदराबादने टीममध्ये खलील अहमदच्याऐवजी बसील थंपी आणि शाहबाज नदीमच्याऐवजी अब्दुल समदला संधी दिली. तर कोलकात्याने कुलदीप यादव आणि लॉकी फर्ग्युसनला टीममध्ये घेतलं. सुनिल नारायणला बॉलिंग टाकायला परावनगी मिळाल्यानंतरही त्याला टीममध्ये स्थान मिळालं नाही. काहीच दिवसांपूर्वी सुनिल नारायणच्या बॉलिंग ऍक्शनवर आक्षेप घेण्यात आले होते. पण आता त्याच्या बॉलिंग ऍक्शनवरचे आक्षेप मागे घेण्यात आले आहेत. टॉस पडल्यानंतर कोलकात्याचा कर्णधार इयन मॉर्गनने सुनिल नारायण (Sunil Narine)ला टीममध्ये का घेतलं नाही, याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. नारायण पूर्णपणे फिट नाही आणि स्पर्धेतल्या पुढच्या मॅच बघता आम्ही कोणताही धोका पत्करू इच्छित नाही, असं मॉर्गन म्हणाला. 'सुनिल हळूहळू ठीक होत आहे. त्याला परवानगी मिळाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. आज तो 100 टक्के फिट नाही, त्यामुळे त्याला मैदानात उतरवण्यासाठी आम्ही घाई करत नाही. स्पर्धेचं स्वरुप बघता आम्ही त्याला विश्रांती देत आहोत. आज नाही तर उद्या तो टीममध्ये पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे,' अशी प्रतिक्रिया मॉर्गनने दिली. सुनिल नारायणच्या बॉलिंग ऍक्शनला आयपीएलच्या बॉलिंग ऍक्शन समितीने हिरवा कंदिल दिला. मागच्याच आठवड्यात सुनिल नारायणच्या बॉलिंग ऍक्शनवर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. पंजाबविरुद्धच्या मॅचवेळी अंपायरनी नारायणच्या ऍक्शनवर संशय घेतला होता. पुन्हा एकदा नारायणच्या बॉलिंग ऍक्शनवर संशय घेतला असता, तर त्याला संपूर्ण स्पर्धेत बॉलिंग करता आली नसती. आता मात्र समितीनेच आक्षेप नसल्याचं सांगितल्यामुळे कोलकाता आणि सुनिल नारायणवरचं संकट टळलं आहे. 32 वर्षांच्या सुनिल नारायणचं नाव आयपीएलच्या संशयास्पद बॉलिंग ऍक्शनच्या यादीतून काढून टाकण्यात आलं आहे. 2015 साली नारायणला आयसीसीनेही बॉलिंग ऍक्शनमुळे बंदी घातली होती. पण 2016 साली ऍक्शनमध्ये बदल करुन नारायण पुन्हा क्रिकेटमध्ये परतला. पाकिस्तान सुपर लीगमध्येही 2018 साली नारायणच्या ऍक्शनवर तक्रार दाखल करण्यात आली होती, पण नंतर त्याची ऍक्शन योग्य असल्याचं निष्पन्न झालं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या