मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

गावसकरांनी बदललं क्रिकेटमधल्या वादग्रस्त नियमाचं नाव, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही सुनावलं

गावसकरांनी बदललं क्रिकेटमधल्या वादग्रस्त नियमाचं नाव, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही सुनावलं

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) हे नेहमीच त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी आणि सडेतोड भूमिकांसाठी ओळखले जातात.

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) हे नेहमीच त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी आणि सडेतोड भूमिकांसाठी ओळखले जातात.

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) हे नेहमीच त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी आणि सडेतोड भूमिकांसाठी ओळखले जातात.

  • Published by:  Shreyas

दुबई, 7 ऑक्टोबर : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) हे नेहमीच त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी आणि सडेतोड भूमिकांसाठी ओळखले जातात. यावेळीही क्रिकेटमधल्या सगळ्यात वादग्रस्त नियमाच्या नावावर बोट ठेवलं आहे. भारतीय क्रिकेटपटू विनू मंकड यांच्या नावावरून ठेवण्यात आलेल्या मंकड (Mankad) आऊट या नावाला गावसकर यांनी विरोध केला आहे. आयपीएल (IPL 2020)मध्ये बैंगलोर (RCB)आणि दिल्ली (Delhi Capitals)यांच्यातल्या मॅचवेळी अश्विन (Ashwin)ने एरॉन फिंच (Aron Finch)ला इशारा दिला.

या मॅचवेळी कॉमेंट्री करत असताना गावसकर म्हणाले, 'अश्विनने फिंचला ब्राऊन करण्याचा प्रयत्न केला.' 1947 साली बिल ब्राऊन यांना विनू मंकड यांनी बॉल टाकायच्या आधीच क्रिजमधून बाहेर आल्यामुळे आऊट केलं होतं.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना याच मुद्द्याला गावसकर यांनी हात घातला. '30 यार्डात किती फिल्डर असावेत, यासाठी त्यांनी नियम बनवले आहेत. जर एखादा खेळाडू 30 यार्डाच्या बाहेर गेला तर नो बॉल दिला जातो. त्या बॉलला एखादा खेळाडू आऊट झाला, तरी त्याला नॉट आऊट दिलं जातं. मला त्याबद्दल काहीच आक्षेप नाही, कारण तो नियम आहे. मग बॅट्समन आधीच क्रिज सोडत असेल, तर ते योग्य कसं? स्पिरीट ऑफ क्रिकेटची भ्रामक कल्पना स्वैरपणे राबवली जात आहे. अश्विनने बॉल टाकायच्या आधी फिंच एक ते दीड फूट यार्ड पुढे होता. यामुळे नॉन-स्ट्रायकर एण्डला उभ्या असलेल्या बॅट्समनला किती फायदा मिळतो, याचा विचार करा,' असं मत गावसकर यांनी मांडलं.

'ऑस्ट्रेलियाचे खेळाडू कधी शिकणार? हा विचार माझ्या डोक्यात ते पाहिल्यावर पहिल्यांदा आला. कारण बिल ब्राऊन यांच्यासोबत 1947 साली जे झालं, तेच 2020 साली होत आहे. ते अजूनही शिकलेले नाहीत. तुम्ही बॉलर कडे बघितलं पाहिजे आणि जेव्हा तो बॉल सोडेल तेव्हा क्रिज सोडली पाहिजे. नियम हा अगदी स्पष्ट आहे,' अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली.

'विनू मंकड हे महान भारतीय क्रिकेटपटू आहेत. भारताला मॅच जिंकवून देणारे ते सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडरपैकी एक आहेत. क्रिकेट जगतात ज्याला अखिलाडूवृत्ती म्हणलं जातं, त्यासाठी तुम्ही त्यांचं नाव वापरता. याचा स्वीकार केला जाऊ शकत नाही. भारताच्या महान खेळाडूचं नाव अशा ठिकाणी घेतलं जाऊ नये. भारतीय माध्यमांमध्येही हे नाव घेतलं जातं, तेव्हा मला आश्चर्य वाटतं. भारतीय माध्यमांना भारताच्याच एका महान क्रिकेटपटूबद्दल आदर नाही का? भारतीय म्हणून तुम्ही या शब्दांना प्रोत्साहन देता कामा नये. अश्विनने फिंचला ब्राऊन करण्याचा प्रयत्न केला, असं मी कॉमेंट्री करताना म्हणालो, कारण 1947 साली चूक विनू मंकड यांची नाही, तर बिल ब्राऊन यांची होती,' असं वक्तव्य गावसकर यांनी केलं.

First published: