दुबई, 8 ऑक्टोबर : भारताचे माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू सुनील गावसकर आयपीएल (IPL 2020)मध्ये कॉमेंट्री करत आहेत. कॉमेंट्री करताना गावसकर हे त्यांच्या रोखठोक आणि सडेतोड मांडणीमुळे कायमच चर्चेत असतात. जोफ्रा आर्चर आणि टॉम करन हे इंग्लंडचे फास्ट बॉलर त्यांचा कर्णधार इयन मॉर्गनला आयपीएलमध्ये मुद्दाम बाऊन्सर टाकत नाहीत, असा आरोप गावसकर यांनी केला होता. तर कॉमेंट्री करताना विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माबाबत केलेल्या टिप्पणीमुळे गावसकर वादात सापडले होता. आता पुन्हा एकदा गावसकर चर्चेत आले आहेत.
सुनील गावसकर (Sunil Gavaskar)यांच्या उंचीची सोशल मीडियावर टर उडवण्यात आली. गावसकर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन आणि ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स ऍँकर नरोली मीडोजसोबत उभे होते. या दोघांसमोर गावसकर छोटे दिसत होते. यानंतर एकाने गावसकर यांच्या उंचीवर वक्तव्य केलं.
सुनील गावसकर यांचा अपमान सौराष्ट्रकडून रणजी खेळणाऱ्या शेल्डन जॅक्सन याला सहन झाला नाही. 'गावसकर यांची उंची भलेही कमी असो, पण त्यांनी देशासाठी काय केलं, ते पाहा. जास्त उंचीची माणसं ज्या गोष्टी मिळवू शकत नाहीत, त्या गावसकर यांनी मिळवल्या आहेत. नकारात्मकतेऐवजी सकारात्मकता पसरवा,' असं ट्विट शेल्डन जॅक्सन यांनी केलं आहे.
may be in height, but look what he has done and achieved for the country, not many tall men could achieve . your a cricket fan as of what i learn n see from your tweets there's already alot of negativity, try to spread a little positivity pleaseplease https://t.co/wLYHOWYPbP
— Sheldon Jackson (@ShelJackson27) October 8, 2020
सुनील गावसकर यांची उंची 5 फूट 4 इंच असली तरी त्यांनी भारतासाठी 10 हजारांपेक्षा जास्त टेस्ट रन केले आहेत. त्यांच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 34 शतकं आहेत.