Home /News /sport /

IPL 2020 : ...म्हणून गावसकरांनी लाईव्ह कॉमेंट्री करताना मागितली रोहितची माफी

IPL 2020 : ...म्हणून गावसकरांनी लाईव्ह कॉमेंट्री करताना मागितली रोहितची माफी

आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये मुंबई (Mumbai Indians)च्या बॉलरनी धडाकेबाज बॉलिंग केली. या मॅचमध्ये कॉमेंट्री करताना सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही चूक केली, त्यामुळे गावसकर यांना रोहित शर्मा (Rohit Sharma)ची माफी मागावी लागली.

पुढे वाचा ...
    दुबई, 10 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये मुंबई (Mumbai Indians)च्या बॉलरनी धडाकेबाज बॉलिंग केली. फास्ट बॉलर ट्रेन्ट बोल्टने मॅचच्या पहिल्याच बॉलला मार्कस स्टॉयनिसची विकेट घेतली. यानंतर पुढच्याच ओव्हरला बोल्टने अजिंक्य रहाणेला माघारी धाडलं. शिखर धवनही 15 रन करून आऊट झाला. दिल्लीच्या बॅट्समनकडून मॅचमध्ये चुका होत असताना कॉमेंट्री करताना सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही चूक केली, त्यामुळे गावसकर यांना रोहित शर्मा (Rohit Sharma)ची माफी मागावी लागली. सुनील गावसकर आणि आकाश चोप्रा पावरप्लेदरम्यान कॉमेंट्री करत होते, त्यावेळी पहिल्या तीन ओव्हरमध्ये ट्रेन्ट बोल्टने स्टॉयनिस आणि रहाणेची विकेट घेतली होती, तर जसप्रीत बुमराहने दुसऱ्या ओव्हरमध्ये जबदरस्त बॉल टाकला होता. तरीही रोहितने चौथ्या ओव्हरमध्ये ऑफ स्पिनर जयंत यादवला बॉल दिला. रोहित शर्माच्या या निर्णयावर गावसकर यांनी प्रश्न उपस्थित केले. बुमराहला आणखी एक ओव्हर दिली पाहिजे होती, असं गावसकर म्हणाले. पण जयंत यादवने त्याच्या पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्याच बॉलवर धवनला बोल्ड केलं. धवनची विकेट गेल्यानंतर गावसकर यांनी रोहित शर्माची माफी मागितली. रोहित शर्माच्या अशाच निर्णयामुळे तो मुंबईला चारवेळा आयपीएल जिंकवणारा कर्णधार बनला आहे, असं मत गावसकर यांनी मांडलं. तसंच जयंत यादव बॉलिंग करत असताना मी कॉमेंट्री करणार नाही, असंही गावसकर म्हणाले. मुंबईने जयंत यादवला राहुल चहरच्याऐवजी टीममध्ये घेतलं होतं. मुंबईच्या या निर्णयावर हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनीही प्रश्न उपस्थित केले होते. पण जयंत यादवने चांगली कामगिरी करुन रोहितचा निर्णय योग्य ठरवला. जयंत यादवने या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 1 विकेट घेतली.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या