IPL 2020 : गावसकर पुन्हा चर्चेत; लाईव्ह कॉमेंट्रीमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंवर गंभीर आरोप

IPL 2020 : गावसकर पुन्हा चर्चेत; लाईव्ह कॉमेंट्रीमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंवर गंभीर आरोप

आयपीएल (IPL 2020) मध्ये विराट कोहली (Virat Kohli)ची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma)बाबत केलेल्या वक्तव्यानंतर वादात सापडलेल्या सुनील गावसकर यांनी आता गंभीर आरोप केले आहेत.

  • Share this:

दुबई, 2 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) मध्ये विराट कोहली (Virat Kohli)ची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma)बाबत केलेल्या वक्तव्यानंतर वादात सापडलेल्या सुनील गावसकर यांनी आता गंभीर आरोप केले आहेत. आयपीएलमध्ये खेळत असलेले इंग्लंडचे फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आणि टॉम करन (Tom Curran) जाणूनबुजून त्यांच्या राष्ट्रीय टीमचा कर्णधार इऑन मॉर्गन (Eoin Morgan)ला बाऊन्सर टाकत नाहीत, असं गावसकर म्हणाले.

बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)यांच्यात झालेल्या मॅचवेळी लाईव्ह कॉमेंट्री करताना सुनील गावसकर (Sunil Gavaskar)यांनी हे आरोप केले आहेत.

राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्याच्या विजयात मॉर्गनने महत्त्वाची भूमिका बजावली. मॉर्गनच्या 34 रनच्या जलद खेळीमुळे कोलकात्याने 174 रनपर्यंत मजल मारली. कोलकात्याच्या या आव्हानाचा पाठलाग राजस्थानला करता आला नाही.

कोलकात्याच्या बॅटिंगवेळी 18व्या ओव्हरमध्ये टॉम करनने टाकलेल्या फुलटॉस बॉलवर मॉर्गनने फोर मारली. त्यावेळी कॉमेंट्री करताना गावसकर म्हणाले, 'टॉम करनने आपल्या कर्णधाराला अगदी सोपा फुलटॉस दिला आणि कर्णधाराने तो बॉल बाऊंड्रीच्या बाहेर पोहोचवला, हे चांगलं आहे. जोफ्रा आर्चरने मागच्या ओव्हरमध्ये मॉर्गनला एकही बाऊन्सर टाकला नाही. तुमचा सगळ्यात जलद बॉलर बाऊन्सर टाकेल, अशी अपेक्षा तुम्ही करता, पण आर्चरने असं केलं नाही.'

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातल्या 12व्या मॅचमध्ये कोलकात्याने राजस्थानच्या विजयाचा रथ रोखला. बुधवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये कोलकात्याने राजस्थानचा 37 रनने पराभव केला. कोलकात्याचा यंदाच्या मोसमातला हा पहिला विजय, तर राजस्थानचा पहिलाच पराभव होता.

Published by: Shreyas
First published: October 2, 2020, 8:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या