IPL 2020 : धवल कुलकर्णी थोडक्यात बचावला, सचिनने केली नव्या नियमाची मागणी

IPL 2020 : धवल कुलकर्णी थोडक्यात बचावला, सचिनने केली नव्या नियमाची मागणी

आयपीएल (IPL 2020) च्या मंगळवारी हैदराबाद (SRH)आणि मुंबई (Mumbai Indians)यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईचा खेळाडू धवल कुलकर्णी थोडक्यात बचावला. बॅटिंग करताना धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni)एक रन पूर्ण करत असताना त्याच्या हेल्मेटवर बॉल आदळला.

  • Share this:

 शारजाह, 4 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या मंगळवारी हैदराबाद (SRH)आणि मुंबई (Mumbai Indians)यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईचा खेळाडू धवल कुलकर्णी थोडक्यात बचावला. बॅटिंग करताना धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni)एक रन पूर्ण करत असताना त्याच्या हेल्मेटवर बॉल आदळला. मुंबईची बॅटिंग सुरू असताना जेसन होल्डरने टाकलेल्या इनिंगच्या शेवटच्या बॉलवर धवलने शॉट मारला. यावेळी धवलने दोन रन काढल्या, पण जेव्हा फिल्डरने बॉल विकेटकीपरकडे फेकला, तेव्हा तो बॉल धवलच्या हेल्मेटवर लागला. धवलच्या हेल्मेटच्या मागच्या बाजूला जोरात बॉल लागल्यामुळे हेल्मेटचा काही भाग तुटून खाली पडला.

सुदैवाने धवल कुलकर्णीला यात कुठलीही दुखापत झाली नाही. सोमवारी याच विषयावर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ने मत व्यक्त केलं होतं. त्याने या घटनेनंतर ट्विट करत हेल्मेट वापरणं का सक्तीचं केलं पाहिजे याबाबत सांगितलं.

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेदरम्यान असं घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना विजय शंकरबाबत सुद्धा घडली होती. रन घेताना त्याच्या हेल्मेटवर सुद्धा बॉल जोरात येऊन आदळला होता.

या गोष्टी लक्षात घेऊन सचिन तेंडुलकरने ट्विट केलं आणि त्याद्वारे त्यांनी आयसीसीने सर्व बॅट्समनना खेळताना हेल्मेट घालणं बंधनकारक करण्यास सांगितलं पाहिजे अशी मागणी केली आहे. 'खेळ वेगवान झाला आहे परंतु तो अधिक सुरक्षित आहे का? अशी प्रतिक्रिया सचिनने मंगळवारी ट्विटरवरून घटनेच्या व्हिडिओ सोबत व्यक्त केली.

'नुकतीच आपण एक घटना पाहिली जी मनाला वेदना देणारी आहे. बॉलर कुठल्याही प्रकारची बॉलिंग करणारा असो, पण बॅट्समननी हेल्मेट घालणं बंधनकारक असलंच पाहिजे" अशी सूचना सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटद्वारे आयसीसीला केली. ही विनंती करताना सचिनने ट्विटमध्ये सर्व क्रिकेट बोर्डांना टॅगसुद्धा केलं.

बॅटिंग करताना बॅट्समनने स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. बरेच वेळा स्पिनर बॉलिंग करत असताना बॅट्समन हेल्मेट काढून ठेवतात, पण हे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. यामुळेच सचिनने आयसीसीकडे बॅट्समनना हेल्मेट घालणं बंधनकारक करण्याची मागणी केली आहे.

Published by: Shreyas
First published: November 4, 2020, 7:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या