अबु धाबी, 9 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या क्वालिफायर-2 मध्ये दिल्ली (Delhi Capitals)ने हैदराबाद (SRH)चा 17 रनने पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. पहिले बॅटिंग करणाऱ्या दिल्लीने हैदराबादला 190 रनचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 172 रनच करता आल्या. दिल्लीचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या हैदराबादची सुरुवात खराब झाली. 44 रनवरच त्यांचे 3 बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. पण केन विलियमसनने एकहाती किल्ला लढवला, पण विलियमसनची विकेट गेल्यानंतर अब्दुल समदनेही दिल्लीपुढे अडचणी निर्माण केल्या, पण कगिसो रबाडा (Kagiso Rabada) याने एकाच ओव्हरमध्ये मॅच पलटवून टाकली. रबाडाने या मॅचमध्ये 29 रन देऊन 4 विकेट घेतल्या.
रबाडाने 19व्या ओव्हरमध्ये अब्दुल समद, राशिद खान आणि श्रीवत्स गोस्वामी यांना माघारी धाडलं. 19व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला रबाडाने समदला, चौथ्या बॉलवर राशिद खानला आणि पाचव्या बॉलला गोस्वामीला आऊट केलं. लागोपाठ तीन बॉलला तीन विकेट घेतल्यानंतरही रबाडाच्या नावावर हॅट्रिक झाली नाही. रबाडाने राशिदची विकेट घेतल्यानंतर पुढचा बॉल वाईड टाकला आणि जास्तीच्या बॉलवर गोस्वामीची विकेट घेतली. बॉलरने तीन वैध बॉलवर तीन विकेट घेतल्या तरच त्याला हॅट्रिक मानलं जातं, पण रबाडाने यामध्ये एक वाईड बॉल टाकल्यामुळे त्याच्या नावावर हॅट्रिकची नोंद झाली नाही.
हॅट्रिकबाबत नियम नाही
क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या एमसीसीच्या नियमांमध्ये हॅट्रिकबाबत कोणताही नियम बनवण्यात आलेला नाही.
....तर वाईड बॉलवरही हॅट्रिक
बॉलरने वाईड बॉल टाकला आणि बॅट्समन हिट विकेट झाला किंवा स्टम्पिंग झाला तर मात्र त्याची नोंद हॅट्रिक म्हणून केली जाते.