IPL 2020 : एलिमिनेटरमध्ये बँगलोरचे दिग्गज अपयशी, हैदराबादला 132 रनचं आव्हान

IPL 2020 : एलिमिनेटरमध्ये बँगलोरचे दिग्गज अपयशी, हैदराबादला 132 रनचं आव्हान

आयपीएल (IPL 2020) च्या एलिमिनेटरच्या सामन्यात बँगलोर (RCB)चा मुकाबला हैदराबाद (SRH)विरुद्ध होत आहे.

  • Share this:

अबु धाबी, 6 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या एलिमिनेटर मॅचमध्ये बँगलोर (RCB)चे दिग्गज अपयशी ठरले आहेत. हैदराबाद (SRH)ने केलेल्या अचूक बॉलिंगमुळे बँगलोरला 20 ओव्हरमध्ये 131 रनपर्यंतच मजल मारता आली आहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता. यानंतर जेसन होल्डरने सुरुवातीलाच विराट कोहलीच्या रुपात बँगलोरला मोठा धक्का दिला. तर या मोसमात फॉर्ममध्ये असलेला देवदत्त पडिक्कल एक रन करून माघारी परतला. यानंतर एबी डिव्हिलियर्स आणि एरॉन फिंच यांनी बँगलोरची इनिंग सावरायला सुरुवात केली. एबीने 43 बॉलमध्ये 56 रन तर फिंचने 30 बॉलमध्ये 32 रन केले. याशिवाय बँगलोरच्या कोणत्याच खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर नटराजनला 2 आणि शाहबाज नदीमला 1 विकेट मिळाली.

आयपीएल (IPL 2020) च्या एलिमिनेटरच्या सामन्यात बँगलोर (RCB)चा मुकाबला हैदराबाद (SRH)विरुद्ध होत आहे. या मॅचमध्ये ऋद्धीमान सहाला दुखापत झाल्यामुळे हैदराबादने श्रीवत्स गोस्वामीला संधी दिली आहे. बँगलोरचा ऑलराऊंडर क्रिस मॉरिसही दुखापतग्रस्त झाला आहे. बँगलोरने मॉरिस, जोशुआ फिलिप आणि इसरू उडाना यांच्याऐवजी एरॉन फिंच, मोईन अली आणि एडम झम्पाला संधी दिली आहे. तर शाहबाज अहमदऐवजी नवदीप सैनीचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.

आजच्या मॅचमध्ये पराभूत होणाऱ्या टीमचं यंदाच्या आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात येईल, तर विजयी झालेली टीम क्वालिफायर-2 मध्ये दिल्लीविरुद्ध खेळेल. रविवारी होणाऱ्या क्वालिफायर-2 च्या या सामन्यात ज्याचा विजय होईल, ती टीम फायनलमध्ये मुंबईविरुद्ध खेळेल.

बँगलोरची टीम

देवदत्त पडिक्कल, एरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, मोईन अली, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, नवदीप सैनी, एडम झम्पा, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल

हैदराबादची टीम

डेव्हिड वॉर्नर, श्रीवत्स गोस्वामी, केन विलियमसन, मनिष पांडे, प्रियम गर्ग, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, शाहबाज नदीम, संदीप शर्मा, टी नटराजन

Published by: Shreyas
First published: November 6, 2020, 7:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading