IPL 2020 : चांगल्या सुरुवातीनंतर हैदराबादची बॅटिंग गडगडली, तरी पंजाबला मोठं आव्हान

IPL 2020 : चांगल्या सुरुवातीनंतर हैदराबादची बॅटिंग गडगडली, तरी पंजाबला मोठं आव्हान

डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टोने दिलेल्या चांगल्या सुरुवातीनंतरही हैदराबादची बॅटिंग गडगडली आहे. तरी त्यांनी पंजाबला विजयासाठी मोठं आव्हान दिलं आहे.

  • Share this:

दुबई, 8 ऑक्टोबर : डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टोने दिलेल्या चांगल्या सुरुवातीनंतरही हैदराबादची बॅटिंग गडगडली आहे. तरी त्यांनी पंजाबला विजयासाठी मोठं आव्हान दिलं आहे. हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 201 रनपर्यंत मजल मारता आली. ओपनर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो यांच्यामध्ये 160 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली. बेयरस्टो 55 बॉलमध्ये 97 रन करून तर वॉर्नर 40 बॉलमध्ये 52 रन करून आऊट झाला. यानंतर मात्र हैदराबादच्या इतर बॅट्समनना चमक दाखवता आली नाही. 160 रन वर एकही विकेट नसलेल्या हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावल्या. पंजाबकडून रवी बिष्णोईने 3 विकेट घेतल्या, तर अर्शदीप सिंगला 2 आणि मोहम्मद शमीला 1 विकेट मिळाली.

आयपीएल (IPL 2020) च्या या मॅचमध्ये हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात हैदराबादने एक तर राहुलने तीन बदल केले. हैदराबादने सिद्धार्थ कौलऐवजी खलील अहमदला संधी दिली आहे. तर पंजाबने जॉर्डन, ब्रार आणि सरफराजला डच्चू दिला आहे, त्यांच्याऐवजी प्रभसीमरन, अर्शदीप आणि मुजीब उर रहमानला टीममध्ये घेतलं आहे.

आजच्या मॅचमध्ये या दोन्ही टीमना विजय गरजेचा आहे. पंजाब आणि हैदराबादच्या टीम यंदाच्या आयपीएल (IPL 2020)मध्ये संघर्ष करताना दिसत आहेत. पंजाबने आतापर्यंत खेळलेल्या 5 मॅचपैकी 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे, तर त्यांना फक्त एकच मॅच जिंकता आली आहे. तर दुसरीकडे हैदराबादच्या टीमला 5 पैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळाला, तर 3 मॅचमध्ये त्यांच्या पदरी निराशा आली. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबची टीम शेवटच्या म्हणजेच 8व्या क्रमांकावर आहे. तर हैदराबाद 7व्या क्रमांकावर आहे.

हैदराबादची टीम

डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, केन विलियमसन, मनिष पांडे, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, राशीद खान, संदीप शर्मा, खलील अहमद, टी नटराजन

पंजाबची टीम

केएल राहुल, मयंक अग्रवाल, मनदीप सिंग, निकोलस पूरन, सिमरन सिंग, ग्लेन मॅक्सवेल, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, मुजीब उर रहमान, मोहम्मद शमी, शेल्डन कॉट्रेल

Published by: Shreyas
First published: October 8, 2020, 7:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या