IPL 2020 : पंजाबची हाराकिरी सुरूच, आता हैदराबादने धुव्वा उडवला

IPL 2020 : पंजाबची हाराकिरी सुरूच, आता हैदराबादने धुव्वा उडवला

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात पंजाब (KXIP)ची हाराकिरी सुरूच आहे. पंजाबच्या टीमचा आता हैदराबाद (SRH)ने तब्बल 69 रननी धुव्वा उडवला आहे.

  • Share this:

दुबई : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात पंजाब (KXIP)ची हाराकिरी सुरूच आहे. पंजाबच्या टीमचा आता हैदराबाद (SRH)ने तब्बल 69 रननी धुव्वा उडवला आहे. हैदराबादने ठेवलेल्या 202 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा 16.5 ओव्हरमध्ये 132 रनवर ऑल आऊट झाला. पंजाबकडून निकोलास पूरनने 37 बॉलमध्ये 77 रनची वादळी खेळी केली. पण पंजाबच्या इतर कोणत्याही बॅट्समनने त्याला साथ दिली नाही. पंजाबचे शेवटचे तिन्ही बॅट्समन शून्य रनवर आऊट झाले. हैदराबादकडून राशिद खानने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर खलील अहमद-टी नटराजन यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. अभिषेक शर्माला 1 विकेट घेण्यात यश आलं.

या मॅचमध्ये हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर वॉर्नरने बेयरस्टोच्या मदतीने पहिल्या विकेटसाठी 160 रनची पार्टनरशीप केली. बेयरस्टो 97 रनवर आणि वॉर्नर 52 रन करून माघारी परतले. बेयरस्टो आणि वॉर्नर यांची विकेट गेल्यानंतर हैदराबादच्या पुढच्या बॅट्समनचा टिकाव लागला नाही. 20 ओव्हरमध्ये हैदराबादचा स्कोअर 201-6 एवढा झाला. पंजाबकडून रवी बिष्णोईने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. अर्शदीप सिंगला 2 आणि मोहम्मद शमीला 1 विकेट मिळाली.

या पराभवामुळे पंजाबचा पुढचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. पंजाबने आतापर्यंत 6 पैकी फक्त एकच मॅच जिंकली आहे, तर 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबची टीम शेवटच्या म्हणजेच 8व्या क्रमांकावर आहे.

Published by: Shreyas
First published: October 8, 2020, 11:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या