Home /News /sport /

IPL 2020 : गांगुलीला आवडला हा कर्णधार, विराटला दिला मोलाचा सल्ला

IPL 2020 : गांगुलीला आवडला हा कर्णधार, विराटला दिला मोलाचा सल्ला

आयपीएल (IPL 2020)च्या या मोसमाच्या आता शेवटच्या काही मॅच उरल्या आहेत. यावर्षीही अनेक युवा खेळाडूंनी त्यांची प्रतिभा दाखवली आहे, पण बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly)याला पंजाब (KXIP)चा कर्णधार केएल राहुल याची कामगिरी आवडली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 8 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या या मोसमाच्या आता शेवटच्या काही मॅच उरल्या आहेत. यावर्षीही अनेक युवा खेळाडूंनी त्यांची प्रतिभा दाखवली आहे, पण बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly)याला पंजाब (KXIP)चा कर्णधार केएल राहुल याची कामगिरी आवडली आहे. केएल राहुलसारख्या प्रतिभावान खेळाडूला टेस्ट क्रिकेटमध्ये पाय रोवण्यासाठी भरपूर वेळ आहे, कारण त्याच्याकडे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटचा मॅच विनर होण्याची क्षमता आहे, असं गांगुली म्हणाला आहे. आयपीएलच्या या मोसमात केएल राहुल (KL Rahul) सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. इंडिया टुडेच्या इन्सपिरेशन या कार्यक्रमात बोलताना गांगुली म्हणाला, 'केएल राहुल टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी बनला आहे. टेस्ट मॅचसाठी राहुलकडे बराच कालावधी आहे. पण टीममध्ये कोण राहणार आणि कोण नाही, याचा निर्णय निवड समितीला घ्यायचा आहे,' असं वक्तव्य गांगुलीने केलं. आयपीएलमध्ये सर्वाधिक रन केल्या तरी राहुलच्या पंजाबला प्ले-ऑफ गाठता आलं नाही. पण राहुल भारतासाठी मॅच विनर सिद्ध होईल, असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला. राहुल तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळू शकतो, मी त्याला शुभेच्छा देतो. भारताला विजय मिळवून देण्यात तो योगदान देईल, जे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली. विराटला सल्ला याचसोबत सौरव गांगुलीने विराटलाही सल्ला दिला आहे. विराटच्या नेतृत्वात भारतीय टीमला दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल, असं गांगुली म्हणाला. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये 2018-19 साली टेस्ट सीरिज जिंकली, पण दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणिन न्यूझीलंडमध्ये चांगली कामगिरी करायला पाहिजे होती, असं विधान गांगुलीने केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या