Home /News /sport /

IPL 2020 : स्मिथला सूर गवसला, राजस्थानचं बँगलोरला 178 रनचं आव्हान

IPL 2020 : स्मिथला सूर गवसला, राजस्थानचं बँगलोरला 178 रनचं आव्हान

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याला सूर गवसला आहे. स्मिथच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान (Rajastha Royals) ने बँगलोर (RCB) ला विजयासाठी 178 रनचं आव्हान दिलं आहे.

    दुबई, 17 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याला सूर गवसला आहे. स्मिथच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान (Rajastha Royals) ने बँगलोर (RCB) ला विजयासाठी 178 रनचं आव्हान दिलं आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 177-6 पर्यंत मजल मारता आली. बेन स्टोक्स आणि रॉबिन उथप्पा या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 50 रनची ओपनिंग पार्टनरशीप केली. स्टोक्स 15 रन करून, तर उथप्पा 22 बॉलमध्ये 41 रन करून आऊट झाला. स्टीव्ह स्मिथने 36 बॉलमध्ये 57 रन केले. बँगलोरकडून क्रिस मॉरिसने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, आणि युझवेंद्र चहलला 2 विकेट मिळाल्या. राजस्थानने या मॅचसाठी टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत, तर बँगलोरने मात्र सिराजच्याऐवजी गुरुकिरत मान आणि शिवम दुबेच्याऐवजी शाहबाज अहमद याला संधी दिली आहे. पॉईंट्स टेबलमध्ये बँगलोरची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत, तर 3 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे राजस्थानची टीम पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. राजस्थानने 8 पैकी 3 सामने जिंकले असून 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी राजस्थानला या मॅचमध्ये जिंकणं गरजेचं आहे. राजस्थानची टीम बेन स्टोक्स, जॉस बटलर, स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी बँगलोरची टीम एरॉन फिंच, देवदत्त पडीकल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, गुरुकिरत मान, वॉशिंग्टन सुंदर, क्रिस मॉरिस, शाहबाज अहमद, इसुरू उडाना, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या