Home /News /sport /

IPL 2020 : दिल्लीने काढली कोलकात्याच्या बॉलिंगची पिसं, श्रेयस अय्यरची तुफान फटकेबाजी

IPL 2020 : दिल्लीने काढली कोलकात्याच्या बॉलिंगची पिसं, श्रेयस अय्यरची तुफान फटकेबाजी

्रेयस अय्यर (Shreyas Iyer)च्या तुफान फटकेबाजीमुळे दिल्ली (Delhi Capitals)ने कोलकाता (Kolkata Knight Riders)ला विजयासाठी डोंगराएवढं आव्हान दिलं आहे.

    शारजाह : श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)च्या तुफान फटकेबाजीमुळे दिल्ली (Delhi Capitals)ने कोलकाता (Kolkata Knight Riders)ला विजयासाठी डोंगराएवढं आव्हान दिलं आहे. पहिले बॅटिंग करणाऱ्या दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 228 रन केले आहेत. श्रेयस अय्यरने 38 बॉलमध्ये नाबाद 88 रनची वादळी खेळी केली. तर पृथ्वी शॉ याने 41 बॉलमध्ये 66 रन केले. ऋषभ पंतनेही शेवटच्या काही ओव्हरमध्ये फटकेबाजी करत श्रेयस अय्यरला मदत केली. पंत 17 बॉलमध्ये 38 रनची खेळी करुन माघारी परतला. कोलकात्याकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर कमलेश नागरकोटी आणि वरुण चक्रवर्तीला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. या मॅचमध्ये कोलकात्याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या