IPL 2020 : शिखर धवनचं लागोपाठ दुसरं शतक, दिल्लीचं पंजाबला 165 रनचं आव्हान

IPL 2020 : शिखर धवनचं लागोपाठ दुसरं शतक, दिल्लीचं पंजाबला 165 रनचं आव्हान

IPL 2020 आयपीएल (IPL) मध्ये लागोपाठ दोन शतकं करण्याचा विक्रम शिखर धवन (Shikhar Dhawan) च्या नावावर झाला आहे. पंजाब (KXIP)विरुद्धच्या मॅचमध्ये शिखर धवनने केलेल्या 61 बॉलमध्ये नाबाद 106 रनच्या जोरावर दिल्ली (Delhi Capitals)ने 20 ओव्हरमध्ये 164-5 एवढा स्कोअर केला आहे.

  • Share this:

दुबई, 20 ऑक्टोबर : आयपीएल (IPL) मध्ये लागोपाठ दोन शतकं करण्याचा विक्रम शिखर धवन (Shikhar Dhawan) च्या नावावर झाला आहे. पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये शिखर धवनने केलेल्या 61 बॉलमध्ये नाबाद 106 रनच्या जोरावर दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 164-5 एवढा स्कोअर केला आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या दिल्लीची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनर पृथ्वी शॉ स्वस्तात माघारी परतला. यानंतरही दिल्लीला श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या रुपात दोन धक्के लागले, तरी धवनने एक बाजू लावून धरली. धवन वगळता दिल्लीच्या कोणत्याही बॅट्समनला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पंजाबकडून मोहम्मद शमीने 2 विकेट घेतल्या, तर जेम्स नीशम, ग्लेन मॅक्सवेल, मुरुगन अश्विन यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

या मॅचमध्ये दिल्ली (Delhi Capitals)चा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)ने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात 2 सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून पंजाबची टीम या सामन्यात उतरत आहे, तर दुसरीकडे दिल्लीने शिखर धवनच्या शतकाच्या जोरावर मागच्या मॅचमध्ये चेन्नईचा पराभव केला होता.

या मॅचसाठी दिल्लीने टीममध्ये 3 बदल केले आहेत. ऋषभ पंत, शिमरन हेटमायर आणि डॅनियल सॅम्स यांचं टीममध्ये आगमन झालं आहे. तर ऍलेक्स कॅरी, एनरिच नॉर्किया आणि अजिंक्य रहाणे यांना बाहेर बसावं लागलं आहे. दुसरीकडे पंजाब (KXIP) ने त्यांच्या टीममध्ये एक बदल केला आहे. क्रिस जॉर्डनच्या जागी जेम्स नीशमला संधी देण्यात आली आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीने 9 पैकी 7 मॅच जिंकल्या आहेत, तर पंजाबला 9 पैकी फक्त 3 मॅचच जिंकता आल्या असून 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाब सातव्या क्रमांकावर आहे.

दिल्लीची टीम

पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, शिमरन हेटमायर, डॅनियल सॅम्स, मार्कस स्टॉयनिस, अक्सर पटेल, आर. अश्विन, तुषार देशपांडे, कागिसो रबाडा

पंजाबची टीम

केएल राहुल, मयंक अग्रवाल, क्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, दीपक हुडा, जेम्स नीशम, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग

Published by: Shreyas
First published: October 20, 2020, 7:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या