Home /News /sport /

IPL 2020 : या टीममध्ये एकत्र दिसणार मुंबईचे तीन दिग्गज खेळाडू?

IPL 2020 : या टीममध्ये एकत्र दिसणार मुंबईचे तीन दिग्गज खेळाडू?

आयपीएल (IPL 2020) चा यंदाचा मोसम आता अर्ध्यावर येऊन ठेपला आहे. या मोसमात मुंबई (Mumbai Indians) आणि दिल्ली (Delhi Capitals) च्या टीम आघाडीवर आहेत.

    दुबई, 9 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) चा यंदाचा मोसम आता अर्ध्यावर येऊन ठेपला आहे. या मोसमात मुंबई (Mumbai Indians) आणि दिल्ली (Delhi Capitals) च्या टीम आघाडीवर आहेत. दोन्ही टीमचे बॅट्समन चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असले तरी दिल्लीचा ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan)मात्र संघर्ष करताना दिसत आहे. राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्येही शिखर धवन दुसऱ्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. धवन 4 बॉलमध्ये 5 रन करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. जोफ्रा आर्चरने टाकलेला बॉल मिड विकेटच्या दिशेने मारत असताना तिकडे उभ्या असलेल्या यशस्वी जयस्वालने धवनचा कॅच पकडला. शिखर धवनची बॅट मागच्या 6 मॅचपासून शांत आहे. या मोसमात शिखर धवनने एकही अर्धशतक केलेलं नाही. धवनने 6 मॅचमध्ये 22 च्या सरासरीने 132 रन केले आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 122 आहे. यंदाच्या आयपीएलमधला त्याचा सर्वाधिक स्कोअर 35 रन आहे. धवन जर असाच खेळत असेल, तर त्याचं टीममधलं स्थान धोक्यात येऊ शकतं. शिखर धवनची विकेट गेल्यानंतर दिल्लीची बॅटिंग अडखळली. राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये शारजाहच्या पाटा खेळपट्टीवरही दिल्लीचे बॅट्समन अपयशी ठरले. पृथ्वी शॉ 19 रन करुन आणि कर्णधार श्रेयस अय्यर 22 रनवर आऊट झाला. रहाणेला संधी? शिखर धवन अपयशी होत असल्यामुळे दिल्लीची टीम बेंचवर बसलेल्या अजिंक्य रहाणेचा ओपनर म्हणून विचार करु शकतचे. अजिंक्यने आयपीएलच्या 132 इनिंगमध्ये 32.93च्या सरासरीने 3,820 रन केले आहेत. रहाणेच्या नावावर आयपीएलमध्ये 2 शतकं आणि 27 अर्धशतकं आहेत. रहाणे दिल्लीकडून ओपनिंगला आला तर तो स्वत:, पृथ्वी शॉ आणि तिसऱ्या क्रमांकावर येणारा श्रेयस अय्यर असे दिल्लीचे सुरुवातीचे तिन्ही बॅट्समन हे मुंबईचे ठरतील.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या