Home /News /sport /

IPL 2020 : धवनच्या शतकाने दिल्लीला जिंकवलं, चेन्नईच्या प्ले-ऑफच्या आशा धुसर

IPL 2020 : धवनच्या शतकाने दिल्लीला जिंकवलं, चेन्नईच्या प्ले-ऑफच्या आशा धुसर

शिखर धवन (Shikhar Dhawan)च्या नाबाद शतकी खेळीमुळे दिल्ली (Delhi Capitals)ने चेन्नई (CSK)चा 5 विकेटने पराभव केला आहे.

    शारजाह, 17 ऑक्टोबर : शिखर धवन (Shikhar Dhawan)च्या नाबाद शतकी खेळीमुळे दिल्ली (Delhi Capitals)ने चेन्नई (CSK)चा 5 विकेटने पराभव केला आहे. दिल्लीच्या शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 17 रनची गरज होती. तेव्हा धोनीने बॉल रविंद्र जडेजाच्या हातात दिला. पण अक्सर पटेलने जडेजाच्या या ओव्हरला तीन सिक्स मारून दिल्लीला विजय मिळवून दिला. शिखर धवनने 58 बॉलमध्ये नाबाद 101 रन केले, यामध्ये 14 फोर आणि एक सिक्सचा समावेश होता. शिखर धवनचं टी-20 क्रिकेटमधलं हे पहिलंच शतक होतं. तर अक्सर पटेलने 5 बॉलमध्ये नाबाद 21 रन केले. चेन्नईने ठेवलेल्या 180 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात अत्यंत खराब झाली. पृथ्वी शॉ शून्य रनवर तर अजिंक्य रहाणे 8 रनवर आऊट झाला. यानंतर श्रेयस अय्यर आणि मार्कस स्टॉयनिस यांनी धवनला चांगली साथ दिली. कर्णधार श्रेयस अय्यरने 23 बॉलमध्ये 23 रन आणि स्टॉयनिसने 14 बॉलमध्ये 24 रन केले. चेन्नईकडून दीपक चहरने 2 विकेट घेतल्या, तर सॅम करन, शार्दुल ठाकूर आणि ड्वॅन ब्राव्होला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या मॅचमध्ये चेन्नईने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता, पण त्यांची सुरुवातही दिल्लीप्रमाणेच झाली. ओपनर सॅम करन शून्य रन करुन माघारी परतला. पण डुप्लेसिसने 58 रन, रायुडूने 45 रन आणि वॉटसनने 36 रन केले. जडेजानेही 13 बॉलमध्ये 33 रन करुन चेन्नईला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. या पराभवासोबतच चेन्नईच्या टीमचा प्ले-ऑफसाठी पोहोचण्याचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला आता त्यांच्या उरलेल्या 5 पैकी 5 मॅच जिंकाव्या लागणार आहेत. या 5 मॅच जिंकल्या तरच चेन्नईला 16 पॉईंट्सपर्यंत जाता येईल. यातल्या एका मॅचमध्ये जरी त्यांचा पराभव झाला, तरी त्यांना 14 पॉईंट्स मिळतील, अशा परिस्थितीमध्ये त्यांना इतर टीमची कामगिरी आणि नेट रनरेटवर अवलंबून राहावं लागणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. चेन्नईने 9 मॅचपैकी 3 मॅच जिंकल्या आहेत, तर 5 मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. दुसरीकडे दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. दिल्लीने 9 पैकी 7 मॅचमध्ये विजय मिळवला आहे, तर फक्त 2 मॅचमध्येच त्यांचा पराभव झाला आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या