मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : 'ही टीम जिंकणारी नाही तर...', सेहवागचा पुन्हा चेन्नईवर निशाणा

IPL 2020 : 'ही टीम जिंकणारी नाही तर...', सेहवागचा पुन्हा चेन्नईवर निशाणा

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK)ची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. चेन्नईच्या या कामगिरीवर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)ने निशाणा साधला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 23 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK)ची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचं आव्हान कायम ठेवायचं असेल तर चेन्नईला आज मुंबई (Mumbai Indians)विरुद्धची मॅच जिंकावीच लागणार आहे. ही मॅच जिंकली तरी चेन्नईला पुढच्या सगळ्या मॅच जिंकून इतर टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. हे सगळं गणित बघता चेन्नई यंदाच्या वर्षी प्ले-ऑफमध्ये दिसणार नाही, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. चेन्नई आतापर्यंत आयपीएलचे जेवढे मोसम खेळली, त्या सगळ्यात प्ले-ऑफमध्ये पोहोचली होती. हे वर्ष मात्र त्याला अपवाद ठरू शकतं.

चेन्नईच्या या कामगिरीवर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)ने निशाणा साधला आहे. चेन्नईची टीम जिंकणारी नाही, तर वृद्ध कल्याण केंद्र असल्याचं सेहवाग म्हणाला आहे.

सेहवाग सध्या सोशल नेटवर्किंगवर 'वीरू की बैठक' हा खास कार्यक्रम करतो. या कार्यक्रमात बोलताना त्याने धोनीच्या टीमवर टीका केली. 'चेन्नईची टीम वृद्ध कल्याण केंद्र आहे. या टीममधला ड्वॅन ब्राव्हो आधीच व्हीआरएस घेऊन परतला आहे,' असं सेहवाग म्हणाला.

पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम शेवटच्या क्रमांकावर आहे. सोबतच त्यांचा नेट रनरेटही उणे (-0.463) आहे. चेन्नईला आणखी 4 मॅच खेळायच्या आहेत. या मॅच मुंबई, बँगलोर आणि कोलकाता या टीमविरुद्ध आहेत. उरलेल्या या चारही मॅचमध्ये चेन्नईला विजय मिळवावा लागेल, तरच त्यांना प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे.

सेहवागने याआधीही चेन्नईच्या कामगिरीवर निशाणा साधला होता. 12 वीच्या परीक्षेत एक दिवस आधी अभ्यास करून लोकं पास होत नाहीत, असं टोमणा सेहवागने मारला होता. तसंच चेन्नईचे खेळाडू याला सरकारी नोकरी समजतात, कामगिरी करा किंवा नका करू, कोणीही तुम्हाला नोकरीवरून काढून टाकत नाही, असं वक्तव्यही सेहवागने केलं होतं.

First published: