IPL 2020 : मांजरेकरांनी केली त्यांच्या आयपीएल टीमची घोषणा, या खेळाडूंना संधी

IPL 2020 : मांजरेकरांनी केली त्यांच्या आयपीएल टीमची घोषणा, या खेळाडूंना संधी

आयपीएल (IPL 2020)चा यंदाचा मोसम संपायला आता फक्त 2 मॅच शिल्लक आहेत. त्यामुळे भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंची टीम बनवली आहे.

  • Share this:

मुंबई, 8 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)चा यंदाचा मोसम संपायला आता फक्त 2 मॅच शिल्लक आहेत. त्यामुळे भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंची टीम बनवली आहे. मांजरेकर यांनी मुंबई (Mumbai Indians)कडून तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)ला संधी दिली आहे.

ईएसपीएन-क्रिकइन्फोशी बोलताना मांजरेकर यांनी सूर्यकुमार यादवचं कौतुक केलं आहे. आयपीएलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर त्याच्याएवढी चांगली कामगिरी कोणीही केली नसल्याचं मांजरेकर म्हणाले. सूर्याने सातत्याने रन केले, तसंच शानदार शॉटही मारले, असं वक्तव्य मांजरेकर यांनी केलं.

आणखी कोणाला संधी?

संजय मांजरेकर यांनी टीममध्ये केएल राहुल, मयंक अग्रवाल यांना ओपनर म्हणून तर एबी डिव्हिलियर्सला चौथ्या क्रमांकावर, निकोलस पूरनला पाचव्या क्रमांकावर ठेवलं आहे. पूरन हा धोकादायक बॅट्समन असल्याचं मांजरेकर म्हणाले. फास्ट बॉलिंगमध्ये त्यांनी बुमराह, आर्चर तर स्पिनर म्हणून राशिद खानला निवडलं आहे. केएल राहुल त्यांच्या टीमचा विकेट कीपर आहे.

मांजरेकर यांची टीम

केएल राहुल, मयंक अग्रवाल, सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स, निकोलस पूरन, अक्षर पटेल, राशिद खान, जोफ्रा आर्चर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

Published by: Shreyas
First published: November 8, 2020, 4:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या