मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : ट्रोलिंगचा शिकार होत असलेल्या युवा भारतीय क्रिकेटपटूच्या मदतीला धावला सचिन

IPL 2020 : ट्रोलिंगचा शिकार होत असलेल्या युवा भारतीय क्रिकेटपटूच्या मदतीला धावला सचिन

 आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात अनेक युवा क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय दिग्गजांसमोर आपली प्रतिभा दाखवत आहेत. यात काहींना यश येत आहे, तर काही जण अपयशी ठरत आहेत. अपयशी ठरत असलेल्या या क्रिकेटपटूंना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) मात्र ट्रोलिंगचा शिकार झालेल्या युवा क्रिकेटपटूच्या मदतीला धावला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

अबु धाबी, 11 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात अनेक युवा क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय दिग्गजांसमोर आपली प्रतिभा दाखवत आहेत. यात काहींना यश येत आहे, तर काही जण अपयशी ठरत आहेत. अपयशी ठरत असलेल्या या क्रिकेटपटूंना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मात्र ट्रोलिंगचा शिकार झालेल्या युवा क्रिकेटपटूच्या मदतीला धावला आहे. शनिवारी कोलकाता (KKR)विरुद्धच्या मॅचमध्ये पंजाब (KXIP)चा पुन्हा पराभव झाला. सुनील नारायण आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या शानदार बॉलिंगच्या जोरावर कोलकात्याने पंजाबला 2 रननी मात दिली.

या मॅचच्या 18व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर सुनील नारायणला मोठा शॉट मारत असताना निकोलस पूरन आऊट झाला. पूरनची विकेट गेल्यानंतर पंजाबने प्रभसिमरन सिंग (Prabhsimran Singh)याला बॅटिंगसाठी पाठवलं. प्रभसिमरन 7 बॉलमध्ये 4 रन करुन आऊट झाला. यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. पण सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)याने मात्र प्रभसिमरनला पाठिंबा दिला आहे. एवढच नाही तर सचिनने प्रभसिमरनचं कौतुक केलं आहे. याचा व्हिडिओ सचिनने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे.

'प्रभसिमरनचा बॅट स्विंग चांगला आहे आणि त्याच्याकडे बॅकलिफ्टही आहे. एका चांगल्या बॅट्समनमध्ये या गोष्टी असतात. त्याच्या बॅटमधून येणारा आवाज मला आवडला. मी प्रभसिमरनची थोडी बॅटिंग बघितली, तो या स्पर्धेत धोकादायक सिद्ध होऊ शकतो,' असं सचिन म्हणाला.

सचिनच्या या ट्विटवर प्रभसिमरन यानेही प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही जे बोललात ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, असं प्रभसिमरन म्हणाला.

प्रभसिमरनने अजून एकही प्रथम श्रेणी मॅच खेळलेली नाही. पण आक्रमक बॅटिंगमुळे तो चर्चेत आला आहे. 20 वर्षांच्या या युवा क्रिकेटपटूला पंजाबने 4.80 कोटी रुपयांना विकत घेतलं. लिलावामध्ये बँगलोर, मुंबई आणि पंजाब या तिघांनी त्याच्यावर बोली लावली होती.

अंडर 23 स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये 2019 साली अमृतसरविरुद्ध प्रभसिमरनने 298 बॉलमध्ये 301 रन केले होते, यानंतर तो चर्चेत आला होता. प्रभसिमरनच्या त्या खेळीमध्ये 29 फोर आणि 13 सिक्सचा समावेश होता. प्रभसिमरन अंडर-18 स्पर्धेत आशिया कपमध्ये भारताकडून खेळला. मागच्या मोसमात प्रभसिमरन हैदराबादच्या टीममध्ये होता. त्यावेळी त्याला एकच मॅच खेळता आली होती.

First published: