Home /News /sport /

IPL 2020 : विराट कोहलीच्या त्या निर्णयामुळे सचिन तेंडुलकरही झाला हैराण

IPL 2020 : विराट कोहलीच्या त्या निर्णयामुळे सचिन तेंडुलकरही झाला हैराण

आयपीएल (IPL 2020)च्या एलिमिनेटरमध्ये हैदराबाद (SRH)ने बँगलोर (RCB)चा पराभव केला. याचसोबत विराट कोहली (Virat Kohli)च्या टीमचं यंदाच्या आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं. या मॅचमध्ये विराटच्या निर्णयामुळे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ही हैराण झाला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 8 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या एलिमिनेटरमध्ये हैदराबाद (SRH)ने बँगलोर (RCB)चा पराभव केला. याचसोबत विराट कोहली (Virat Kohli)च्या टीमचं यंदाच्या आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं. या मॅचमध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याऐवजी ओपनिंगला बॅटिंगला आल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं. देवदत्त पडिक्कलसोबत ओपनिंगला येऊन टीमला चांगली सुरुवात देण्यासाठी विराट मैदानात उतरला, पण जेसन होल्डरने त्याच्या रणनीतीला यश मिळवून दिलं नाही. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)यालाही विराटचा ओपनिंगला येण्याचा निर्णय हैराण करणारा वाटला, पण सचिनने जेसन होल्डरचंही कौतुक केलं. 'होल्डरचा पहिला स्पेल शानदार होता. विराटला ओपनिंगला पाहून मीही हैराण झालो. ही एक वेगळी रणनीती होती, पण त्याला यश मिळालं नाही. विराट सकारात्मक दिसत होता, पण होल्डरसमोर त्याला बॉल नीट खेळता येत नव्हता. होल्डरनेही अचूक दिशेने आणि अचूक टप्प्यावर बॉलिंग केली,' असं सचिन म्हणाला. 'जेसन होल्डरच्या बॉलला इतर बॉलरपेक्षा चांगली उसळी मिळत होती. विराटलाही या उसळणाऱ्या बॉलनेच चकवा दिला. विराटनंतर होल्डरने देवदत्त पडिक्कललाही आऊट केलं. एबी डिव्हिलियर्स आणि कोहली या टीमचा पाया आहेत. होल्डरच्या दोन विकेटने मॅच संपूर्ण बदलून गेली,' अशी प्रतिक्रिया सचिनने दिली. जेसन होल्डरशिवाय सचिन तेंडुलकरने हैदराबादचा डावखुरा स्पिनर शाहबाज नदीम याचंही कौतुक केलं. नदीमने राशिद खानसोबतच एबी डिव्हिलियर्सची परीक्षा घेतली. 'दोन्ही स्पिनरनी चांगली बॉलिंग केली. राशिद नेहमीच चांगली बॉलिंग करतो, पण नदीमसोबत त्याने उत्कृष्ठ कामगिरी केली. एबीकडे आक्रमण करण्याची कोणतीच संधी नव्हती. नदीमने त्याला तसं स्वातंत्र्यच दिलं नाही. एबी लेग स्टम्पकडे गेल्यानंतर नदीमने तिकडेच बॉल टाकला. नदीमची बॉलिंग बघायला मजा आली,' असं वक्तव्य सचिनने केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या