IPL 2020 : ऋतुराज गायकवाडवर पैशांचा पाऊस, या बड्या कंपनीने केला करार

IPL 2020 : ऋतुराज गायकवाडवर पैशांचा पाऊस, या बड्या कंपनीने केला करार

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK)ची कामगिरी निराशाजनक झाली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईच्या टीमने प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला नाही. पण ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)च्या रुपात चेन्नईला भविष्यातला स्टार खेळाडू मिळाला.

  • Share this:

पुणे: आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK)ची कामगिरी निराशाजनक झाली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईच्या टीमने प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला नाही. पण ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)च्या रुपात चेन्नईला भविष्यातला स्टार खेळाडू मिळाला. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर आता ऋतुराज गायकवाडवर पैशांचा पाऊस पडायला लागला आहे. स्पोर्ट्स मार्केटिंग आणि स्किल मॅनजमेंट कंपनी बेसलाईन व्हेंचर्सने ऋतुराज गायकवाडसोबत करार केला आहे. ही कंपनी ऋतुराज गायकवाडच्या व्यावसायिक हिताची देखरेख करेल. पुण्यात जन्मलेल्या गायकवाडने 2016 साली झारखंडविरुद्धच्या मॅचमधून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

ऋतुराज गायकवाडला चेन्नईने 2019 साली झालेल्या लिलावात 20 लाख रुपयांच्या किंमतीत विकत घेतलं होतं. या आयपीएलमध्ये चेन्नईच्या शेवटच्या तिन्ही मॅचमध्ये ऋतुराजने अर्धशतकं केली. ऋतुराज आयपीएल इतिहासात अनकॅप खेळाडू (आंतरराष्ट्रीय मॅच न खेळलेला) ने लागोपाठ 3 अर्धशतकं करणारा पहिलाच खेळाडू ठरला. या मोसमात ऋतुराजने 51 च्या सरासरीने 204 रन केले.

बेसलाईन व्हेंचर्स पी.व्ही.सिंधू, स्मृती मंधाना, दीपिका कुमारी, भुवनेश्वर कुमार, पंकज अडवाणी, सौरव घोषाल, संजू सॅमसन आणि अमित पंघाल यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंचं प्रतिनिधीत्व करते. 'बेसलाईन देशातल्या मोठ्या खेळाडूंचं प्रतिनिधीत्व करते, या कंपनीशी जोडलो गेल्यामुळे उत्साही आहे,' अशी प्रतिक्रिया ऋतुराजने दिली आहे.

चेन्नईची खराब कामगिरी

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई सातव्या क्रमांकावर राहिली. यंदा चेन्नईला 14 पैकी 6 मॅच जिंकता आल्या, तर 8 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. पण चेन्नईला ऋतुराज गायकवाड आणि सॅम करन यांच्या रुपात भविष्यातले चांगले खेळाडू मिळाले आहेत.

Published by: Shreyas
First published: November 5, 2020, 8:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या