मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : धोनीचा तो सल्ला, आणि मग ऋतुराजने ठोकली लागोपाठ तीन अर्धशतकं

IPL 2020 : धोनीचा तो सल्ला, आणि मग ऋतुराजने ठोकली लागोपाठ तीन अर्धशतकं

यंदाच्या आयपीएल (IPL 2020) मध्ये चेन्नई (CSK) ची कामगिरी फारशी चांगली झाली नसली, तरी त्यांच्यासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे त्यांना सापडलेला ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा युवा खेळाडू. ऋतुराजने त्याच्या या कामगिरीचं श्रेय धोनी (MS Dhoni) ला दिलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
पुणे, 14 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या या मोसमात चेन्नई (CSK) ची कामगिरी निराशाजनक झाली. तीनवेळा आयपीएल जिंकलेली टीम यावेळी मात्र सातव्या क्रमांकावर राहिली. चेन्नईची कामगिरी फारशी चांगली झाली नसली, तरी त्यांच्यासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे त्यांना सापडलेला ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा युवा खेळाडू. ऋतुराजने चेन्नईला शेवटचे तीन सामने जिंकून देण्यास मदत केली. गायकवाडने शेवटच्या तिन्ही सामन्यात अर्धशतकं केली आणि पुरस्कारही जिंकला. चेन्नईसाठी लागोपाठ तीन अर्धशतकं करणारा ऋतुराज पहिला बॅट्समन ठरला. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ऋतुराजला त्याचे मत विचारल्यानंतर त्याने या चांगल्या कामगिरीचे श्रेय कॅप्टन एम. एस. धोनी (MS Dhoni) ला दिलं. एका मुलाखतीत ऋतुराजने सांगितलं की, धोनीने त्याच्याशी खास संवाद साधला आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्या म्हणूनच याला धोनीच जबाबदार असल्याचं ऋतुराज म्हणाला. धोनीनी साधला ऋतुराजशी संवाद ऋतुराजने मुलाखतीत बोलताना सांगितले 'कॅप्टन धोनीनी त्याची मानसिक स्थिती जाणली होती, आणि त्यानंतर त्याच्याशी बोलून त्याचा सर्व मानसिक ताण कमी केला होता. मला माहीत होतं की मुंबईविरुद्ध खेळणं हे सर्वांत मोठं आव्हान असणार आहे. मला बोल्ट, बुमराह आणि पॅटिन्सनसारख्या बॉलरना सामोरं जावं लागणार आहे. मागच्या सामन्यातील माझ्या खराब कामगिरीमुळे मी खूपच निराश होतो. माझा आत्मविश्वास खचला होता. पण त्यानंतर धोनी सर माझ्याकडे आला आणि त्याने मला विचारले की तुझ्यावर कसला ताण आहे का? यावर धोनीने मला सांगितले की कुठलाही तणावाखाली खेळायची गरज नाही. आपण कायमच आपल्याकडून चांगले खेळायचा प्रयत्न करायचा. आणि तू चांगला खेळशील याबाबत मला अपेक्षा आहे. मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे, की खेळताना तणावाखाली खेळू नकोस, त्या खेळाचा आनंद घे आणि आपली चांगली कामगिरी उत्तम बजाव.' 'धोनीचा सल्ला माझ्यासाठी खूपच मोलाचा ठरला. खेळाचा आनंद घेत खेळ, कामगिरीबद्दल विचार करू नकोस, असं त्याने मला सांगितलं. म्हणूनच बंगळुरूविरुद्ध नाबाद 65, केकेआरविरुद्ध 72 आणि किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 62 रनची खेळी मी खेळू शकलो, अशी प्रतिक्रिया ऋतुराजने दिली. ऋतुराज हा पहिल्या तीन सामन्यांत अपयशी ठरला होता. परंतु तरीही या त्याने सहा सामन्यांमध्ये 51च्या सरासरीनी 204 रन केल्या आणि सलग तीन अर्धशतकंसुद्धा केली.
First published:

पुढील बातम्या