मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : कोरोनाला हरवलं, धोनीला चुकीचं ठरवलं, मराठमोळ्या ऋतुराजचा विक्रम

IPL 2020 : कोरोनाला हरवलं, धोनीला चुकीचं ठरवलं, मराठमोळ्या ऋतुराजचा विक्रम

यंदाच्या आयपीएल (IPL 2020) मध्ये चेन्नई (CSK)ची कामगिरी निराशाजनक झाली. प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर झालेली चेन्नई पहिलीच टीम ठरली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई प्ले-ऑफमध्ये दिसणार नाही. पण स्पर्धा संपतानाच चेन्नईला ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) च्या रुपात हिरा सापडला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

अबु धाबी, 1 नोव्हेंबर : यंदाच्या आयपीएल (IPL 2020) मध्ये चेन्नई (CSK)ची कामगिरी निराशाजनक झाली. प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर झालेली चेन्नई पहिलीच टीम ठरली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई प्ले-ऑफमध्ये दिसणार नाही. पण स्पर्धा संपतानाच चेन्नईला हिरा सापडला आहे. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) ने या मोसमात सुरुवातीला कोरोनाला मात दिली, त्यानंतर धोनीला चुकीचं ठरवलं आणि शेवटी असा विक्रम केला जो चेन्नईच्या कोणत्याही खेळाडूला आतापर्यंत जमला नव्हता.

ऋतुराजची अर्धशतकांची हॅट्रिक

चेन्नईने आपल्या शेवटच्या मॅचमध्ये पंजाबला 9 विकेटने पराभूत केलं. चेन्नईच्या या विजयाचा हिरो ठरला ऋतुराज गायकवाड. ऋतुराजने या मॅचमध्ये नाबाद 62 रन केले. त्याने डुप्लेसिस आणि रायुडूसोबत अर्धशतकीय पार्टनरशीपही केल्या. गायकवाडने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात लागोपाठ 3 अर्धशतकं केली. त्याने बँगलोरविरुद्ध 65 रन, कोलकाताविरुद्ध 72 रन आणि पंजाबविरुद्ध 62 रनची खेळी केली. गायकवाड चेन्नईचा पहिलाच खेळाडू ठरला आहे, ज्याने लागोपाठ 3 मॅचमध्ये अर्धशतकं केली.

ऋतुराजचा संघर्ष

ऋतुराज गायकवाडच्या आयपीएलला फारशी चांगली सुरुवात झाली नाही. ऋतुराज गायकवाडची कोरोना टेस्ट दोनदा पॉझिटिव्ह आली, त्यामुळे त्याला इतर खेळाडूंपेक्षा दुप्पट कालावधी क्वारंटाईन व्हावं लागलं, त्यामुळे त्याने सरावालाही उशिरा सुरुवात केली. कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर धोनीने ऋतुराजला संधी दिली, पण तिकडेही त्याची सुरुवात खराब झाली. पहिल्याच मॅचमध्ये तो शून्य रनवर आऊट झाला, यानंतर पुढच्या मॅचमध्ये 5 रन आणि नंतर पुन्हा शून्य रनवर त्याला माघारी परतावं लागलं. गायकवाडसोबतच जगदीसनलाही खास कामगिरी करता आली नाही, त्यामुळे चेन्नई सामने हरत गेली आणि प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर झाली.

टीमच्या खराब कामगिरीमुळे निराश झालेल्या धोनीने टीममधल्या युवा खेळाडूंवर निशाणा साधला. टीममधल्या तरुणांमध्ये स्पार्क दिसत नसल्याचं धोनी म्हणाला. यानंतर ऋतुराजने धोनीला चुकीचं ठरवलं. बँगलोरविरुद्धच्या मॅचमध्ये नाबाद 65 रन केल्यानंतर ऋतुराजला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. ऋतुराजचा आयपीएलमधला हा पहिलाच पुरस्कार होता, यानंतर कोलकाताविरुद्ध 72 रन आणि पंजाबविरुद्ध 62 रन केल्यावरही त्याला मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं. सचिन तेंडुलकर यानेही ऋतुराज गायकवाडचं कौतुक केलं. ऋतुराजकडे बघितल्यानंतर तो मोठ्या खेळी करणारा खेळाडू वाटतो, असं सचिन म्हणाला.

First published: