Home /News /sport /

IPL 2020 : विराट-स्मिथचा सामना, राजस्थानचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

IPL 2020 : विराट-स्मिथचा सामना, राजस्थानचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

(IPL 2020)च्या आजच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli)आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith)आमने-सामने आहेत.

    अबु धाबी, 3 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या आजच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli)आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith)आमने-सामने आहेत. बैंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)यांच्यातल्या या मॅचमध्ये स्टीव्ह स्मिथने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. राजस्थानने त्यांच्या टीममध्ये एक बदल केला आहे. अंकित राजपूतच्या ऐवजी महिपाल लोमरोर याला संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे विराटने टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. विराटच्या आरसीबीने मुंबईविरुद्धची मागची मॅच सुपर ओव्हरमध्ये जिंकली होती, तर राजस्थानचा कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाला होता. यंदाच्या मोसमातला राजस्थानचा तो पहिलाच पराभव होता. राजस्थानची टीम पाचव्या क्रमांकावर आणि बैंगलोरची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. या दोन्ही टीमचा 3 पैकी 2 मॅचमध्ये विजय आणि एका मॅचमध्ये पराभव झाला आहे. पण नेट रनरेट चांगला असल्यामुळे राजस्थानची टीम बैंगलोरच्या पुढे आहे. बैंगलोरची टीम देवदत्त पड्डीकल, एरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शिवम दुबे, गुरुकिरत सिंग मान, वॉशिंग्टन सुंदर, इसरु उडाना, नवदीप सैनी, एडम झम्पा, युझवेंद्र चहल राजस्थानची टीम जॉस बटलर, स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, रियान पराग, राहुल टेवटिया, महीपाल लोमरोर, टॉम कुरन, श्रेयस गोपाल, जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या