Home /News /sport /

IPL 2020 : 140 किमीचा बॉल छातीवर आदळला, पुढच्याच बॉलला बॅट्समनने काय केलं पाहा

IPL 2020 : 140 किमीचा बॉल छातीवर आदळला, पुढच्याच बॉलला बॅट्समनने काय केलं पाहा

आयपीएल (IPL 2020)च्या 15व्या मॅचमध्ये मोठा अपघात होता होता राहिला.

    अबु धाबी, 3 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या 15व्या मॅचमध्ये मोठा अपघात होता होता राहिला. रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर (Royal Challengers Bangalore)विरुद्धच्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)चा ऑलराऊंडर राहुल टेवटिया (Rahul Tewatia)दुखापत होण्यापासून थोडक्यात बचावला. नवदीप सैनी (Navdeep Saini)ने टाकलेला फास्ट बॉल राहुल टेवटियाच्या छातीवर जाऊन लागला, यानंतर टेवटिया मैदानातच पडला. राजस्थान रॉयल्सची बॅटिंग सुरु असताना 20व्या ओव्हरमध्ये सैनीने टाकलेला बॉल टेवटियाच्या छातीवर लागला. नवदीप सैनीचा यॉर्कर टाकण्याचा अंदाज चुकला आणि बॉल बिमर गेला. बॉल लागताच टेवटिया मैदानातच कोसळला. राजस्थानच्या टीमचे फिजिओ आणि बैंगलोरचे खेळाडू टेवटियाच्या जवळ गेले आणि त्याची चौकशी केली. सुदैवाने 140 किमी प्रती तासाच्या वेगाचा बॉल छातीवर आदळल्यानंतरही टेवटियाला दुखापत झाली नाही. पुढचा बॉल खेळण्यासाठी टेवटिया उभा राहिला. छातीवर बॉल लागल्यानंतरच्या पुढच्याच बॉलला टेवटियाने सैनीच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. टेवटियाने पुढच्या दोन्ही बॉलवर सिक्स लगावले. सैनीच्या शेवटच्या ओव्हरमध्ये टेवटियाने एकूण 15 रन केले आणि राजस्थानला 154 रनपर्यंत पोहोचवलं. टेवटियाने 12 बॉलमध्ये नाबाद 24 रनची खेळी केली. राहुल टेवटिया राजस्थानसाठी यंदाच्या मोसमात मॅच विनर ठरत आहे. या आयपीएलमध्ये त्याने 11 सिक्स लगावले आहेत. सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टेवटिया संजू सॅमसननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. राहुल टेवटियाच्या या बॅटिंगनंतरही बैंगलोरने राजस्थानचा 8 विकेटने पराभव केला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या