अबु धाबी, 11 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)मध्ये आज पॉईंट्स टेबलमध्ये वरच्या क्रमांकावर असणाऱ्या मुंबई (Mumbai Indians) आणि दिल्ली (Delhi Capitals)यांच्यात सामना होणार आहे. या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)विराट कोहली आणि सुरेश रैनाचा विक्रम मोडण्यापासून एक पाऊल लांब आहे. रोहित शर्माने यंदाच्या मोसमात 6 मॅचमध्ये 35.16च्या सरासरीने आणि 145.51 च्या सरासरीने 211 रन केले आहेत. रोहितच्या बॅटमधून यावर्षी 2 अर्धशतकं आली आहेत. आजच्या मॅचमध्ये रोहितने अर्धशतक केलं तर त्याच्या नावावर आणखी एका रेकॉर्डची नोंद होईल.
रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांनी आयपीएलमध्ये 38 अर्धशतकं केली आहेत. जर रोहितने आज अर्धशतक केलं तर त्याच्या नावावर 39 अर्धशतकं होतील. तसंच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करणारा भारतीय खेळाडू ठरेल. आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 46 अर्धशतकं केली आहेत.
रोहितने आयपीएलमध्ये 194 मॅच खेळून 31.73च्या सरासरीने आणि 131.37च्या स्ट्राईक रेटने 5,109 रन केले आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर एक शतकही आहे. रोहितने या स्पर्धेत 446 फोर आणि 208 सिक्सही मारले आहेत.
आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईने 6 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत, तर 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर दुसरीकडे दिल्लीच्या टीमने 6 पैकी 5 मॅच जिंकल्यामुळे ते पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.