IPL 2020 : मॅच संपल्यावर रोहितने जिंकली चाहत्यांची मनं, चहरसोबत पाहा काय केलं?

IPL 2020 : मॅच संपल्यावर रोहितने जिंकली चाहत्यांची मनं, चहरसोबत पाहा काय केलं?

रोहित शर्मा (Rohit Sharma)च्या नेतृत्वात मुंबई (Mumbai Indians) आणखी एका आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये पोहोचली आहे. गुरुवारी दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा 57 रननी विजय झाला. या मॅचमध्ये मुंबईच्या बॅट्समनसोबतच बॉलरनीही चांगली कामगिरी केली. पण राहुल चहर (Rahul Chahar)चा दिवस मात्र खराब गेला.

  • Share this:

दुबई, 6 नोव्हेंबर : रोहित शर्मा (Rohit Sharma)च्या नेतृत्वात मुंबई (Mumbai Indians) आणखी एका आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये पोहोचली आहे. गुरुवारी दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा 57 रननी विजय झाला. या मॅचमध्ये मुंबईच्या बॅट्समनसोबतच बॉलरनीही चांगली कामगिरी केली. पण राहुल चहर (Rahul Chahar)चा दिवस मात्र खराब गेला. दिल्लीच्या बॅट्समननी चहरला 2 ओव्हरमध्येच 35 रन ठोकले. पण कर्णधार रोहित शर्माने मात्र या कामगिरीनंतर चहरला धीर दिला. मॅच संपल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये जाताना रोहितने चहरला टीमचं नेतृत्व करायला सांगित, सगळ्यात पहिले ड्रेसिंग रूममध्ये जायला सांगितलं.

दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये खराब कामगिरी झाली असली, तरी राहुल चहरने या मोसमात मुंबईसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चहरने या मोसमात 15 विकेट घेतल्या आहेत. यामुळेच एका खराब मॅचनंतर रोहितने राहुल चहरला धीर दिला. रोहित शर्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या मॅचमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर रोहित शर्मा शून्यवर आऊट झाला, तर कायरन पोलार्डलाही शून्य रनवरच माघारी परतावं लागलं. मुंबईचे हे दोन दिग्गज खेळाडू शून्य रनवर आऊट झाल्यानंतरही त्यांनी 20 ओव्हरमध्ये 200 रनचा टप्पा गाठला. सूर्यकुमार यादव आणि क्विंटन डिकॉक यांच्यात सुरुवातीला 78 रनची पार्टनरशीप झाली, तर शेवटी इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी तुफान फटकेबाजी केली.

ट्रेन्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी दिल्लीच्या बॅटिंगला खिंडार पाडलं. शून्य रनवरच दिल्लीच्या 3 विकेट गेल्या होत्या. यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि अक्सर पटेल यांनी दिल्लीला सावरलं, पण आव्हानापासून ते 57 रन लांब राहिले. या मोसमातली मुंबईविरुद्धचा दिल्लीचा हा सलग तिसरा पराभव आहे. या मॅचमध्ये पराभव झाला असला तरी त्यांना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. बँगलोर आणि हैदराबाद यांच्याविरुद्धच्या मॅचमध्ये ज्यांचा विजय होईल त्यांच्याविरुद्ध दिल्ली क्वालिफायर-2 ची मॅच खेळेल.

Published by: Shreyas
First published: November 6, 2020, 8:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading