Home /News /sport /

IPL 2020 : आयपीएल फायनलआधी मुंबईला या गोष्टीची चिंता

IPL 2020 : आयपीएल फायनलआधी मुंबईला या गोष्टीची चिंता

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या हंगामातली फायनल मुंबई (Mumbai Indians) आणि दिल्ली (Delhi Capitals) यांच्यात होणार आहे.

    दुबई, 9 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या हंगामातली फायनल मुंबई (Mumbai Indians) आणि दिल्ली (Delhi Capitals) यांच्यात होणार आहे. रविवारी झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीने हैदराबाद (SRH) ला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईने पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीला पराभूत करून फायनलमध्ये आधीच प्रवेश केला होता. मुंबईच्या टीमने आतापर्यंत शानदार कामगिरी केली असली तरी, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मात्र संपूर्ण स्पर्धा संपत आली तरीही फॉर्म गवसलेला नाही. स्पर्धेच्या मध्येच त्याला दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावं लागलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा अंतिम 11 खेळाडूंमध्ये त्याने स्थान मिळवले. परंतु त्यानंतरही त्याला सूर गवसलेला नाही. जगातील सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक अशी गणना होणाऱ्या रोहित शर्माला यंदाच्या आयपीएलमध्ये संघर्ष करावा लागला आहे. 2019 च्या वर्ल्डकपमध्ये तो सर्वाधिक रन करणारा बॅट्समन होता. स्पर्धेत त्याने 9 मॅचमध्ये 98.33 च्या स्ट्राईक रेटने 648 रन केल्या होत्या. यामध्ये त्याच्या शानदार पाच शतकांचा देखील समावेश होता. रोहित शर्मा याने एका कॅलेंडर वर्षात 2442 रन केल्या होत्या. एका वर्षात त्याच्यापेक्षा फक्त विराट कोहली याने अधिक रन केल्या आहेत. पण या आयपीएल स्पर्धेत रोहित शर्माला फॉर्म सापडलेला नाही. असं असलं तरी टीममधल्या इतर खेळाडूंनी उत्तम कामगिरी केल्यामुळे मुंबईने फायनल गाठली आहे. या आयपीएलमध्ये रोहित शर्माने दोन अर्धशतकी खेळी केल्या आहेत. त्याने कोलकात्याविरुद्ध 54 बॉलमध्ये 80 रन, तर पंजाबविरुद्ध 45 बॉलमध्ये 70 रन केल्या होत्या. या दोन्ही खेळी त्याच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये आल्या होत्या. त्यानंतर एकही सामन्यात रोहितला मोठी खेळी करता आलेली नाही. राजस्थान रॉयल्सविरुद्ध रोहितने 23 बॉलमध्ये 35 रन आणि कोलकात्याविरुद्ध 36 बॉलमध्ये 35 रन केल्या होत्या. परंतु त्यानंतरच्या 11 सामन्यांपैकी 7 सामन्यांमध्ये तो सपशेल अपयशी ठरला आहे. यातील 6 सामन्यांमध्ये त्याने 10 पेक्षा कमी रन केल्या आहेत. तर या सात सामन्यात त्याने 51 बॉल खेळले असून केवळ 86.27 च्या स्ट्राईक रेटने 44 रन केल्या. त्याच्या या अपयशामध्ये स्पिनरचा देखील मोठा हात आहे. 7 सामन्यात 4 वेळा तो स्पिन बॉलिंगवर आऊट झाला आहे. या आयपीएलमध्ये मुंबईच्या सर्वाधिक रन करणाऱ्या चार बॅट्समनमध्येही रोहित शर्माचा समावेश नाही. या स्पर्धेत रोहितने 11 सामन्यांत 126.31 च्या स्ट्राईक रेटने 264 रन केल्या आहेत. याआधी 2018 च्या आयपीएलमध्ये त्याने 286 रन केल्या होत्या. अंतिम सामन्यात रोहित केवळ 22 रनही करू शकला नाही तर 2020 हे त्याच्या आतपर्यंतच्या आयपीएल कारकीर्दितील अपयशी वर्ष ठरेल.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या