स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 : पहिला फोर मारताच रोहितचा विक्रम, विराटला मागे टाकलं

IPL 2020 : पहिला फोर मारताच रोहितचा विक्रम, विराटला मागे टाकलं

आयपीएल (IPL 2020)मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)चा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)ने विक्रमाला गवसणी घातली आहे.

  • Share this:

अबु धाबी, 1 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)चा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)ने विक्रमाला गवसणी घातली आहे. पंजाब (Kings XI Punjab)विरुद्धच्या मॅचमध्ये पहिली रन काढताच रोहितने हे रेकॉर्ड केलं. या मॅचमध्ये फोर मारून रोहित शर्माने त्याचं खातं उघडलं, सोबतच त्याने आयपीएलमध्ये 5 हजार रनचा टप्पा ओलांडला.

आयपीएलमध्ये 5 हजार रन करणारा रोहित शर्मा तिसरा खेळाडू बनला आहे. याआधी सुरेश रैना (Suresh Raina) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनीही आयपीएलमध्ये 5 हजार रन केले आहेत. आयपीएलमध्ये हा रेकॉर्ड फक्त भारतीय क्रिकेटपटूंच्याच नावावर आहे.

आयपीएलमध्ये सगळ्यात जलद 5 हजार रन विराट कोहलीने पूर्ण केले आहेत. विराटने 172 इनिंगमध्ये 37.39च्या सरासरीने 5,430 रन केले आहेत. तर सुरेश रैनाने 189 इनिंगमध्ये 5,368 रन केले आहेत. रोहित शर्माने 187व्या इनिंगमध्ये 5 हजार रनचा टप्पा पूर्ण केला.

बॉलच्या हिशोबाने सुरेश रैनाने सगळ्यात कमी बॉल खेळून 5 हजार रन केले. रैनाला 5 हजार रन करायला 3,619 बॉल लागले, तर रोहितने हे रेकॉर्ड 3,817 बॉलमध्ये पूर्ण केलं. यासाठी विराट कोहलीला सगळ्यात जास्त 3,827 बॉल लागले.

Published by: Shreyas
First published: October 1, 2020, 8:30 PM IST

ताज्या बातम्या