IPL 2020 : ऋषभ पंतने केली पॉण्टिंगची LIVE नक्कल, पाहा VIDEO

IPL 2020 : ऋषभ पंतने केली पॉण्टिंगची LIVE नक्कल, पाहा VIDEO

IPL 2020 कॉमेंटेटर दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) सोबत बोलत होते, तेव्हा ऋषभ पंत (Rishabh Pant) मागून येऊन पॉण्टिंगची नक्कल करत होता. सोशल मीडियावर ऋषभ पंतचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • Share this:

शारजाह, 18 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात दिल्ली (Delhi Capitals)ची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. शनिवारी दिल्लीने चेन्नई (Chennai Super Kings)चा 5 विकेटने पराभव केला. यंदाच्या मोसमातला दिल्लीचा हा सातवा विजय आहे. याचसोबत पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीची टीम 14 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. या मॅचदरम्यान कॉमेंटेटर दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) सोबत बोलत होते, तेव्हा ऋषभ पंत (Rishabh Pant) मागून येऊन पॉण्टिंगची नक्कल करत होता. सोशल मीडियावर ऋषभ पंतचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ऋषभ पंत मांसपेशींच्या दुखापतीमुळे काही मॅचसाठी बाहेर झाला आहे. दिल्ली आव्हानाचा पाठलाग करत असताना रिकी पॉण्टिंग कॅमेरासमोर लाईव्हसाठी आला. त्यावेळी कॉमेंटेटर त्याला प्रश्न विचारत होते, त्याचवेळी पंत पॉण्टिंगच्या मागे येऊन उभा राहिला आणि त्याची नक्कल करु लागला.

राजस्थानविरुद्धच्या मॅचवेळी शेवटच्या बॉलवर वरुण ऍरोनचा कॅच घेताना पंत लंगडताना दिसला. त्यावेळी पंतची दुखापत गंभीर नसेल, असं वाटत होतं. पण पुढच्या मॅचमध्ये पंतला खेळायची संधी मिळाली नाही. अखेर त्याच्याऐवजी ऍलेक्स कॅरीला संधी देण्यात आली. ऋषभ पंतला एक आठवड्याची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याचं दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं.

ऋषभ पंतला ग्रेड-1 ची दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याला एक आठवड्यापेक्षा जास्त काळ बाहेर राहावं लागू शकतं. दिल्लीच्या टीमने पंतचा स्कॅनिंग रिपोर्ट बीसीसीआयला पाठवला आहे. पंत बीसीसीआयशी करारबद्ध खेळाडू असल्यामुळे त्याचा रिपोर्ट बीसीसीआयच्या मेडिकल टीमला पाठवणं बंधनकारक आहे. याआधी ईशांत शर्मा आणि अमित मिश्रा या दिल्लीच्या प्रमुख खेळाडूंनाही दुखापत झाली. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना आयपीएल अर्ध्यात सोडूनच भारतात परत यावं लागलं. तर राजस्थानविरुद्धच्या मॅचवेळी श्रेयस अय्यरच्या खांद्यालाही दुखापत झाली होती, तेव्हा शिखर धवनने काही ओव्हरसाठी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती, पण चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये तो मैदानात उतरला.

Published by: Shreyas
First published: October 18, 2020, 6:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading