IPL 2020 : ...तो रन आऊट करता न आल्यामुळे पंत पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

IPL 2020 : ...तो रन आऊट करता न आल्यामुळे पंत पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात दिल्ली (Delhi Capitals) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पण त्यांच्या टीममधले पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant)हे सोशल मीडियावर वारंवार ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत आहेत.

  • Share this:

दुबई, 21 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात दिल्ली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पण त्यांच्या टीममधले पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant)हे सोशल मीडियावर वारंवार ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत आहेत. या दोन्ही खेळाडूंना यावर्षी त्यांच्या बॅटनेही कमाल दाखवता आली नाही. ऋषभ पंतला तर दुखापतीमुळे काही सामने खेळताही आले नाहीत.

पृथ्वी शॉच्या ट्रोलिंगला काही दिवस होत नाहीत, तोच आता ऋषभ पंत यालाही टार्गेट करण्यात येत आहे. मंगळवारी पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात ऋषभ पंत स्टम्प माईकमधून ओरडताना दिसला. ऋषभ पंतला साधे सरळ आणि सोपे बॉलही अडवताना अडचण येत होती. निकोलस पूरन याचा रन आऊट पंतने सोडल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली.

मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये केएल राहुलने केलेल्या रन आऊटप्रमाणेच ऋषभ पंतनेही निकोलस पूरनला रन आऊट करण्याचा प्रयत्न केला, पण यामध्ये त्याला यश आलं नाही. यानंतर सोशल मीडियावर पंतचे मीम्स तयार झाले.

Published by: Shreyas
First published: October 21, 2020, 10:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या