Home /News /sport /

IPL 2020 : आयपीएल फायनलआधी मुंबईसाठी खूशखबर

IPL 2020 : आयपीएल फायनलआधी मुंबईसाठी खूशखबर

आयपीएल (IPL 2020) इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम असलेली मुंबई (Mumbai Indians) मंगळवारी दिल्ली (Delhi Capitals)विरुद्ध फायनल मॅच खेळणार आहे. या महामुकाबल्याआधी मुंबईसाठी दिलासादायक बातमी आहे.

    दुबई, 9 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम असलेली मुंबई (Mumbai Indians) मंगळवारी दिल्ली (Delhi Capitals)विरुद्ध फायनल मॅच खेळणार आहे. या महामुकाबल्याआधी मुंबईसाठी दिलासादायक बातमी आहे. टीमचा फास्ट बॉलर ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) याने नेटमध्ये पुनरागमन केलं आहे. दिल्लीविरुद्धच्या क्वालिफायर-1 मॅचमध्ये बोल्टच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती. त्यामुळे तो फायनल खेळणार का नाही? याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. पण मुंबईच्या टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन खेळाडूंच्या सरावाचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये बोल्टही सराव करताना दिसत आहे. ट्रेन्ट बोल्ट याच्या दुखापतीविषयी मुंबईच्या टीम प्रशासनाने अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. पण व्हिडिओमध्ये तो बॉलिंग करत आहे. दिल्लीविरुद्धच्या क्वालिफायर 1 मॅचमध्ये बोल्टने जबरदस्त सुरुवात केली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये बोल्टने दिल्लीच्या 2 विकेट घेतल्या होत्या. हीच मॅच नाही तर या संपूर्ण आयपीएलमध्ये बोल्टने मुंबईला बहुतेक मॅचमध्ये सुरुवातीलाच विकेट मिळवून दिल्या. या मोसमात मुंबईने केलेल्या शानदार कामगिरीमागे बोल्टचा फॉर्म हेदेखील मुख्य कारण आहे. दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये दुखापतीमुळे बोल्ट 14 व्या ओव्हरमध्येच मैदानाबाहेर गेला होता. मुंबईने ही मॅच 57 रनने जिंकली होती. आयपीएलच्या या मोसमात बोल्ट आणि बुमराह या जोडीने एकूण 49 विकेट घेतल्या आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या