अबु धाबी, 28 ऑक्टोबर : चांगल्या सुरुवातीनंतरही बँगलोर (RCB)च्या खेळाडूंना मुंबई (Mumbai Indians)विरुद्धच्या मॅचमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. बँगलोरने 20 ओव्हरमध्ये 164 रन केले आहेत. या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, पण बँगलोरचे ओपनर देवदत्त पड्डिकल आणि जॉश फिलिप यांनी चांगली सुरुवात केली. या दोघांनी 7.5 ओव्हरमध्येच 71 रन केले, पण यानंतर बँगलोरला वारंवार धक्के लागले. शेवटच्या 4 ओव्हरमध्ये बँगलोरने 4 विकेट गमावून 35 रन केले. देवदत्त पड्डिकलने सर्वाधिक 74 रनची खेळी केली. मुंबईकडून बुमराहने 3 विकेट घेतल्या, तर बोल्ट, चहर आणि पोलार्डला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
आयपीएल (IPL 2020)च्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबई (Mumbai Indians) आणि बँगलोर (RCB)ची टीम मैदानात उतरल्या आहेत. या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये मुंबईने त्यांच्या टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत, तर बँगलोरने मात्र तीन खेळाडू बदलले आहेत. विराट (Virat Kohli)ने नवदीप सैनी, एरॉन फिंच आणि मोईन अली यांच्याऐवजी शिवम दुबे, जॉश फिलिप आणि डेल स्टेन यांना संधी दिली आहे. मुंबईची टीम अजूनही रोहित शर्माशिवाय मैदानात उतरत आहे.
पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम पहिल्या आणि बँगलोरची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई आणि बँगलोरने या मोसमात प्रत्येकी 11 पैकी 7 मॅच जिंकल्या आहेत, पण मुंबईचा नेट रनरेट बँगलोरपेक्षा चांगला असल्यामुळे ते पहिल्या क्रमांकावर आहेत.
मुंबईची टीम
इशान किशन, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, जेम्स पॅटिनसन, राहुल चहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह
बँगलोरची टीम
देवदत्त पड्डिकल, जॉश फिलिप, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, गुरुकिरत मान, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, डेल स्टेन, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल