IPL 2020 : बँगलोरच्या बलाढ्य बॅटिंगला चेन्नईने 145 रनवर रोखलं

IPL 2020 : बँगलोरच्या बलाढ्य बॅटिंगला चेन्नईने 145 रनवर रोखलं

बँगलोर (RCB) च्या बलाढ्य बॅटिंगला चेन्नई (CSK)च्या बॉलरनी 145 रनवर रोखलं आहे. या मॅचमध्ये बँगलोरचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता.

  • Share this:

दुबई, 25 ऑक्टोबर : बँगलोर (RCB) च्या बलाढ्य बॅटिंगला चेन्नई (CSK)च्या बॉलरनी 145 रनवर रोखलं आहे. या मॅचमध्ये बँगलोरचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. यानंतर एरॉन फिंच आणि देवदत्त पडिकल यांनी बँगलोरला 3 ओव्हरमध्ये 30 रनची सुरुवात करुन दिली. पण एरॉन फिंचला पुन्हा एकदा अपयश आलं आणि तो माघारी परतला. यानंतर देवदत्त पडिकल 22 रन करुन आऊट झाला. पण विराट आणि एबी डिव्हिलियर्स यांनी बँगलोरच्या आणखी विकेट जाऊन दिल्या नाहीत. विराटने सर्वाधिक 50 रन केले, तर एबी डिव्हिलियर्स 39 रन करुन आऊट झाला. चेन्नईकडून सॅम करनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर दीपक चहरला 2 आणि मिचेल सॅन्टनरला 1 विकेट मिळाली.

यंदाच्या मोसमात विराटची बँगलोर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, तर चेन्नई (CSK)ची कामगिरी मात्र अत्यंत खराब झाली आहे. चेन्नईच्या टीमचं प्ले-ऑफला पोहोचणं आता जवळपास अशक्य आहे, त्यामुळे आता फक्त सन्मानासाठी चेन्नईची टीम मैदानात उतरणार आहे. बँगलोरच्या टीमने इसरू उडानाच्याऐवजी मोईन अलीला संधी दिली आहे. तर चेन्नईने जॉस हेजलवूड आणि शार्दुल ठाकूरच्याऐवजी मिचेल सॅन्टनर आणि मोनू कुमारला टीममध्ये घेतलं आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये बँगलोरची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. बँगलोरने 10 पैकी 7 मॅचमध्ये विजय मिळवला आहे, तर 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे चेन्नईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच 8व्या क्रमांकावर आहे. आजच्या मॅचमध्ये बँगलोरचा विजय झाला, तर त्यांचं प्ले-ऑफला पोहोचणं जवळपास निश्चित होईल.

बँगलोरची टीम

देवदत्त पडिकल, एरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, मोईन अली, गुरुकिरत मान, क्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल

चेन्नईची टीम

ऋतुराज गायकवाड, फाफ डुप्लेसिस, अंबाती रायुडू, एन जगदीसन, एमएस धोनी, सॅम करन, रविंद्र जडेजा, मिचेल सॅन्टनर, दीपक चहर, इम्रान ताहिर, मोनू कुमार

Published by: Shreyas
First published: October 25, 2020, 3:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या