मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : पंजाबच्या बॉलरनी बँगलोरच्या दिग्गजांना 171 रनवर रोखलं

IPL 2020 : पंजाबच्या बॉलरनी बँगलोरच्या दिग्गजांना 171 रनवर रोखलं

क्रिस मॉरिस आणि इसुरू उडाना यांनी शेवटच्या ओव्हरला केलेल्या 24 रनमुळे बँगलोर (RCB)ला पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये 171 रनपर्यंत मजल मारता आली आहे.

क्रिस मॉरिस आणि इसुरू उडाना यांनी शेवटच्या ओव्हरला केलेल्या 24 रनमुळे बँगलोर (RCB)ला पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये 171 रनपर्यंत मजल मारता आली आहे.

क्रिस मॉरिस आणि इसुरू उडाना यांनी शेवटच्या ओव्हरला केलेल्या 24 रनमुळे बँगलोर (RCB)ला पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये 171 रनपर्यंत मजल मारता आली आहे.

  • Published by:  Shreyas

शारजाह, 15 ऑक्टोबर : क्रिस मॉरिस आणि इसुरू उडाना यांनी शेवटच्या ओव्हरला केलेल्या 24 रनमुळे बँगलोर (RCB)ला पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये 171 रनपर्यंत मजल मारता आली आहे. या मॅचमध्ये बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण सुरुवातीपासूनच बँगलोरच्या बॅट्समनना संघर्ष करावा लागला. त्यातच त्यांनी एबी डिव्हिलियर्सला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याऐवजी वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांना पुढे पाठवण्याची आश्चर्यकारक रणनीती अवलंबली. पण या रणनीतीमध्ये बँगलोरची टीम सपशेल अपयशी ठरली. बँगलोरकडून विराटने 39 बॉलमध्ये सर्वाधिक 48 रन केले. तर 8 बॉलमध्ये नाबाद 25 रन आणि इसरू उडानाने 5 बॉलमध्ये नाबाद 10 रन केले. मॉरिस आणि उडाना यांनी 20व्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीला 24 रन मारले. यात 3 सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. पंजाबकडून मुरुगन अश्विन आणि मोहम्मद शमीला 2 आणि क्रिस जॉर्डनला 1 विकेट मिळाली.

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात अखेर क्रिस गेलचं आगमन झालं आहे. बँगलोर (RCB)विरुद्धच्या मॅचमध्ये गेल अखेर मैदानात उतरला आहे. या मॅचमध्ये बँगलोरचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)ने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला . विराटने त्याच्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही, तर पंजाबने तीन खेळाडू बदलले आहेत. मनदीप सिंगला दुखापत झाली आहे, तर मुजीब उर रहमान आणि प्रभसिमरन यांना डच्चू देण्यात आला आहे. त्याऐवजी गेल, हुडा आणि मुरुगन अश्विन यांना संधी देण्यात आली आहे.

पंजाबची टीम

क्रिस गेल, केएल राहुल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, दीपक हुडा, क्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग

बँगलोरची टीम

देवदत्त पडिकल, एरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, इसरु उडाना, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल

प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याचं आव्हान कायम ठेवायचं असेल, तर पंजाबला ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. पंजाबच्या टीमने या मोसमात 7 पैकी फक्त 1 मॅच जिंकली आहे, तर 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबची टीम शेवटच्या क्रमांकावर आहे. तर बँगलोरने मात्र यावर्षी चमकदार कामगिरी केली आहे. विराटच्या टीमने यंदा 7 पैकी 5 मॅच जिंकल्या तर 2 सामने गमावले आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये बँगलोर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

First published: