शारजाह, 31 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या आजच्या दुसऱ्या मॅचमध्येही पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमला संघर्ष करावा लागला आहे. हैदराबाद (SRH) च्या बॉलिंगपुढे बँगलोर (RCB)च्या दिग्गजांना मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं आहे. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर हैदराबादने बँगलोरला 20 ओव्हरमध्ये 120/7 वर रोखलं. हैदराबादकडून संदीप शर्मा आणि जेसन होल्डरला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर नटराजन, नदीम आणि राशिद खानने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. बँगलोरकडून जॉस फिलिपने सर्वाधिक 32 रन केले. एबी डिव्हिलियर्सला 21 रनची सुरुवात मिळाली, तरी त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
आजच्या बँगलोर (RCB)विरुद्धच्या सामन्यात हैदराबाद (SRH)ला जिंकावच लागणार आहे. प्ले-ऑफच्या रेसमध्ये कायम राहण्यासाठी हैदराबादला विजय मिळवणं गरजेचं आहे. या मॅचमध्ये हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये हैदराबादने टीममध्ये एक बदल केला आहे. विजय शंकरच्याऐवजी अब्दुल समदला संधी देण्यात आली आहे. तर बँगलोरने त्यांच्या टीममध्ये 2 बदल केले आहेत. डेल स्टेनच्याऐवजी इसरू उडाना आणि शिवम दुबेच्या जागी नवदीप सैनीचं टीममध्ये आगमन झालं आहे.
पॉईंट्स टेबलमध्ये बँगलोरची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. 12 पैकी 7 मॅचमध्ये बँगलोरचा विजय झाला असून त्यांना 5 मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे हैदराबादची टीम सातव्या क्रमांकावर आहे. हैदराबादने 12 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.
बँगलोरची टीम
जॉस फिलिप, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, गुरुकीरत मान, वॉशिंग्टन सुंदर, क्रिस मॉरिस, इसरू उडाना, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल
हैदराबादची टीम
डेव्हिड वॉर्नर, ऋद्धीमान सहा, मनिष पांडे, केन विलियमसन, अब्दुल समद, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, रशिद खान, शाहबाज नदीम, संदीप शर्मा, टी नटराजन