मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : ...तर नुकसान रोहितचंच होईल, BCCI च्या रिपोर्टमध्ये खुलासा

IPL 2020 : ...तर नुकसान रोहितचंच होईल, BCCI च्या रिपोर्टमध्ये खुलासा

आयपीएल (IPL 2020) दरम्यान दुखापत झाल्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma)ची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या भारतीय टीममध्ये निवड झाली नाही.

आयपीएल (IPL 2020) दरम्यान दुखापत झाल्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma)ची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या भारतीय टीममध्ये निवड झाली नाही.

आयपीएल (IPL 2020) दरम्यान दुखापत झाल्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma)ची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या भारतीय टीममध्ये निवड झाली नाही.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 1 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) दरम्यान दुखापत झाल्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma)ची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या भारतीय टीममध्ये निवड झाली नाही. पण रोहित शर्मा नेटमध्ये सराव करत असल्यामुळे रोहितला नेमकी कोणती दुखापत झाली आहे? याबाबत उलटसुलट चर्चा आणि वाद सुरू झाले. या वादावर अखेर भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri)यांनी भाष्य केलं आहे. रोहित शर्माने पुनरागमन करण्याची घाई करु नये, कारण मेडिकल रिपोर्टमध्ये त्याला पुन्हा दुखापत वाढण्याचा धोका आहे, असं रवी शास्त्री म्हणाले.

आयपीएलमध्ये मुंबई (Mumbai Indians) आणि पंजाब (KXIP)यांच्यातल्या सामन्यादरम्यान रोहितला दुखापत झाली होती. रोहित शर्माचा मेडिकल रिपोर्ट बघितल्यानंतरच निवड समितीने त्याला टीममध्ये न घेण्याचा निर्णय घेतला. रोहितची तपासणी बीसीसीआयची मेडिकल टीम करत आहे. आमचा कोणाचाही यामध्ये समावेश नसल्याचं स्पष्टीकरण शास्त्री यांनी दिलं. मेडिकल टीमने रोहितचा रिपोर्ट निवड समितीला दिला, ते आपलं काम जाणून आहेत, असं रवी शास्त्री टाईम्स नाऊशी बोलताना म्हणाले.

'रोहितची निवड न होण्यात माझी कोणतीही भूमिका नाही. मी तर निवडीच्या प्रक्रियेचा भागही नव्हतो. पण रोहितच्या मेडिकल रिपोर्टमध्ये त्याने घाई केली तर दुखापत वाढण्याचा धोका असल्याचं म्हणलं आहे,' अशी प्रतिक्रिया शास्त्री यांनी दिली.

'दुखापत होणं यापेक्षा मोठी निराशा खेळाडूसाठी कोणतीच नसते. कधी कधी माहिती असतानाही तुम्ही मैदानात उतरण्याचा प्रयत्न करता आणि किती लवकर पुनरागमन करू शकतो, ते पाहता. त्यामुळे रोहितने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला केलेली चूक पुन्हा करू नये,' असा सल्लाही शास्त्री यांनी दिला आहे.

27 नोव्हेंबरपासून टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात 3 टी-20, 3 वनडे आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम रोहितच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे.

First published: