स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 : राजस्थानने टॉस जिंकला, कोलकात्याची बॅटिंग

IPL 2020 : राजस्थानने टॉस जिंकला, कोलकात्याची बॅटिंग

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईटरायडर्स यांच्यात नेहमीच जोरदार मुकाबला पाहायला मिळाला आहे.

  • Share this:

दुबई, 30 सप्टेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या 12व्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)ने टॉस जिंकून कोलकाता नाईटरायडर्स (Kolkata Knight Riders)ना बॅटिंग दिली आहे. या मॅचमध्ये दोन्ही टीमनी कोणताही बदल केलेला नाही. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये ही मॅच होत आहे. हे स्टेडियम आयपीएल होत असलेल्या तिन्ही स्टेडियममधलं सगळ्यात मोठं आहे. राजस्थान रॉयल्सने आपल्या दोन्ही मॅच शारजाहच्या छोट्या स्टेडियममध्ये खेळल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही मॅचमध्ये सिक्सचा पाऊस पडला होता, या मॅचमध्ये मात्र शारजाहसारखी बॅटिंग करणं आव्हानात्मक असणार आहे.

राजस्थानची टीम

जॉस बटलर, स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन, राहुल तेवतिया, रॉबिन उथप्पा, रियान पराग, जोफ्रा आर्चर, टॉम करन, श्रेयस गोपाल, अंकित राजपूत, जयदेव उनाडकट

कोलकाताची टीम

शुभमन गिल, सुनील नारायण, नितीश राणा, दिनेश कार्तिक, इओन मॉर्गन, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, शिवम मावी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, कमलेश नागरकोटी

कोण कोणावर भारी?

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईटरायडर्स यांच्यात नेहमीच जोरदार मुकाबला पाहायला मिळाला आहे. या दोन्ही टीममध्ये आत्तापर्यंत 20 मॅच झाल्या, यातल्या 10 मॅचमध्ये राजस्थानचा आणि 10 मॅचमध्ये कोलकात्याचा विजय झाला. युएईमध्ये राजस्थानने केकेआरला एकदा हरवलं आहे. मागच्या 5 वर्षांमध्ये केकेआरने राजस्थानचा 4 मॅचमध्ये पराभव केला आहे.

स्पर्धेतली राजस्थान-कोलकात्याची कामगिरी

यावर्षी राजस्थानने कोलकात्यापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. राजस्थानने दोन्ही मॅचमध्ये विजय मिळवला आहे. राजस्थानने या मोसमात चेन्नई आणि पंजाबला धूळ चारली, तर केकेआरने मुंबईविरुद्धची मॅच गमावल्यानंतर हैदराबादचा पराभव केला. राजस्थानची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तर केकेआर 7व्या क्रमांकावर आहे.

Published by: Shreyas
First published: September 30, 2020, 7:50 PM IST
Tags: IPL 2020

ताज्या बातम्या