मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : 12.5 कोटींचा कर्णधार सुपरफ्लॉप, टीममधून बाहेर काढण्याची मागणी

IPL 2020 : 12.5 कोटींचा कर्णधार सुपरफ्लॉप, टीममधून बाहेर काढण्याची मागणी

आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमात अनेक युवा खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवत टीमना अशक्य असे विजय मिळवून दिले आहेत. तर अनेक दिग्गज खेळाडू कोट्यवधी रुपये मिळूनही सपशेल अपयशी ठरत आहेत.

  • Published by:  Shreyas
दुबई, 15 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमात अनेक युवा खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवत टीमना अशक्य असे विजय मिळवून दिले आहेत. तर अनेक दिग्गज खेळाडू कोट्यवधी रुपये मिळूनही सपशेल अपयशी ठरत आहेत. राजस्थान (Rajasthan Roylas)चा कर्णधार स्टीव्ह स्मिथही यंदा अपयशी खेळाडूंच्या यादीत आला आहे. स्मिथचा यंदाच्या आयपीएलमधला फ्लॉप शो सुरूच आहे, जे राजस्थानच्या पराभवांचंही महत्त्वाचं कारण आहे. राजस्थानचा 8 पैकी 5 मॅचमध्ये पराभव झाला आहे, यामुळे टीम पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. राजस्थानच्या टीमवर स्पर्धेतून बाहेर होण्याची टांगती तलवारही आहे. बुधवारी दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्येही स्मिथने टीमला आणि राजस्थानच्या चाहत्यांना निराश केलं. फक्त 1 रन करुन स्मिथ माघारी गेला. अश्विनला अगदी सोपा कॅच देऊन स्मिथ आऊट झाला. राजस्थानचा या मॅचमध्ये 13 रननी पराभव झाला. मागच्या 6 मॅचच्या 5 इनिंगमध्ये त्याने दोन अंकी स्कोअरही केला नाही. स्मिथने मागच्या 6 इनिंगमध्ये 3, 5, 6, 24, 5 आणि 1 रन केले. शारजाहच्या मैदानातच स्मिथच्या बॅटमधून रन आल्या. पहिल्या दोन इनिंगमध्ये त्याने 50 आणि 59 रनची खेळी केली. सोशल मीडियावर आता राजस्थानचे चाहते स्मिथला बाहेर काढण्याची मागणी करत आहेत. बेन स्टोक्सचं टीममध्ये आगमन झाल्यानंतर स्मिथने ओपनिंग सोडली आणि तो तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येऊ लागला. स्मिथच्या या निर्णयाने राजस्थानची बॅटिंग कोसळली. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करणारा संजू सॅमसन आता चौथ्या क्रमांकावर खेळायला लागला.
First published:

पुढील बातम्या