IPL 2020 : सेहवाग म्हणतो, 'हा खेळाडू कोरोनाची लसही बनवू शकतो'

IPL 2020 : सेहवाग म्हणतो, 'हा खेळाडू कोरोनाची लसही बनवू शकतो'

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) हा त्याच्या ट्विटमुळे कायमच चर्चेत असतो. अनेकवेळा सेहवाग त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन खेळाडूंना किंवा टीमना ट्रोल करताना दिसतो, पण आयपीएल (IPL 2020)च्या राजस्थान आणि बँगलोरच्या मॅचमध्ये सेहवागनं राहुल तेवतिया (Rahul Tewatia) चं कौतुक केलं आहे.

  • Share this:

दुबई, 17 ऑक्टोबर : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) हा त्याच्या ट्विटमुळे कायमच चर्चेत असतो. अनेकवेळा सेहवाग त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन खेळाडूंना किंवा टीमना ट्रोल करताना दिसतो, पण आयपीएल (IPL 2020)च्या राजस्थान आणि बँगलोरच्या मॅचमध्ये सेहवागनं राहुल तेवतिया (Rahul Tewatia) चं कौतुक केलं आहे. राहुल तेवतिया काहीही करु शकतो, असं ट्विट सेहवागनं केलं आहे.

बँगलोरविरुद्धच्या मॅचमध्ये राहुल तेवतियाने विराट कोहलीचा अफलातून कॅच घेतला. कार्तिक त्यागीच्या बॉलिंगवर 14व्या ओव्हरमध्ये विराटने मिड विकेटच्या दिशेने बॉल मारला, पण सीमारेषेवर तेवतिया उभा होता. विराटचा कॅच पकडत असताना तेवतियाचा तोल सुटला आणि तो सीमरेषेच्या पलीकडे जात होता, तेवढ्यात त्याने हातातला बॉल उडवला. सीमारेषा ओलांडल्यावर तेवतिया पुन्हा मैदानात आला आणि त्याने कॅच पकडला.

'तेवतिया काहीही करू शकतो. सध्याचा त्याचा फॉर्म बघता, त्याला संधी दिली तर तो कोरोनावरची लसही बनवेल,' असं ट्विट सेहवागने केलं आहे. या ट्विटसोबत सेहवागने तेवतियाच्या त्या कॅचचा फोटोही जोडला आहे.

यंदाच्या मोसमात राजस्थानला फक्त तीन मॅचच जिंकता आल्या आहेत. यापैकी तेवतियाने राजस्थानला दोनवेळा त्याच्या बॅटिंगने विजय मिळवून दिला. आजही विराटची विकेट घेतल्यानंतर राजस्थानचा विजय होईल, असं वाटत होतं, पण एबी डिव्हिलियर्सच्या वादळी खेळीमुळे राजस्थानला पराभव पत्करावा लागला. एबी डिव्हिलियर्सने 22 बॉलमध्ये नाबाद 55 रन केले. यामुळे बँगलोरने 178 रनचं आव्हान 2 बॉल आणि 7 विकेट राखून पूर्ण केलं.

Published by: Shreyas
First published: October 17, 2020, 8:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या