IPL 2020 : 'माझ्या यशामागे झहीर खान', मुंबईच्या बॉलरने दिलं श्रेय

IPL 2020 : 'माझ्या यशामागे झहीर खान', मुंबईच्या बॉलरने दिलं श्रेय

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात मुंबईची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मुंबई (Mumbai Indians)ने या मोसमात खेळलेल्या 9 पैकी 6 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला, तर 3 मॅच त्यांना गमवाव्या लागल्या.

  • Share this:

दुबई, 22 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात मुंबईची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मुंबई (Mumbai Indians)ने या मोसमात खेळलेल्या 9 पैकी 6 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला, तर 3 मॅच त्यांना गमवाव्या लागल्या. हरलेल्या 2 मॅचचा निकाल तर सुपर ओव्हरमध्ये लागला. मुंबईला एवढे विजय मिळवून देण्यात बॅट्समनप्रमाणेच बॉलरनीही मोलाची भूमिका बजावली आहे. बुमराह, बोल्ट, पॅटिन्सन या फास्ट बॉलर त्रिकुटाने मुंबईला सुरुवातीला आणि शेवटी विकेट मिळवून दिल्या, तर लेग स्पिनर राहुल चहर (Rahul Chahar) ने मधल्या ओव्हरमध्ये विरोधी टीमना धक्के दिले. राहुल चहरने या मोसमात एकूण 11 विकेट घेतल्या आहेत.

राहुल चहरने त्याच्या या यशाचं श्रेय झहीर खान (Zaheer Khan) ला दिलं आहे. 'मी झहीर खानकडे जातो, कारण मागच्या वर्षीपासून तो जे काही मला सांगतो, ते समजू शकतो. तो माझी बॉलिंग समजतो. मी बॉलिंग करत असताना तो कधी कधी एक तास तिकडे बसून बघत असतो. मागच्या वर्षी त्याने माझं वेगळं सेशन घेतलं होतं आणि अडचणी आणि त्यावर तोडगाही काढून दिला होता. मी नेहमीच त्याच्याकडे जातो,' असं राहुल चहर म्हणाला आहे.

राहुल चहरने या मोसमात 9 मॅचमध्ये 7.40च्या इकोनॉमी रेटने 11 विकेट घेतल्या आहेत. सुरुवातीला इथल्या खेळपट्ट्या वानखेडे स्टेडियमप्रमाणेच बॅट्समनना मदत करणाऱ्या होत्या, आता खेळपट्ट्या हळू हळू संथ व्हायला लागल्या आहेत, त्यामुळे रणनीती बदलावी लागल्याचं चहरने सांगितलं.

'वानखेडे स्टेडियमवर आखूड टप्प्यावर बॉल टाकायला लागतो, पण इकडे फूल लेन्थ बॉलिंग करावी लागते, कारण मैदानं मोठी आहेत आणि खेळपट्ट्या संथ आहेत. फूल लेन्थ बॉल टाकून आम्ही बॅट्समनवर दबाव टाकू शकतो. मैदानं मोठी असल्यामुळे लेग स्पिनर त्यांना हवी तशी बॉलिंग करु शकतात, ज्यामुळे फायदा होतो. बँगलोरच्या युझवेंद्र चहलनेही या मोसमात 15 विकेट घेतल्या आहेत. लेग स्पिनर इतर स्पिनरच्या तुलनेत बॉलला फ्लाईट जास्त देतो, त्यामुळे बॅट्समनला शॉट खेळणं कठीण होतं, म्हणूनच लेग स्पिनरना यश मिळत आहे,' अशी प्रतिक्रिया राहुल चहरने दिली.

Published by: Shreyas
First published: October 22, 2020, 8:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या