स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 : या दोन खेळाडूंच्या फॉर्मचं मुंबईला टेन्शन, रोहित टीम बदलणार?

IPL 2020 : या दोन खेळाडूंच्या फॉर्मचं मुंबईला टेन्शन, रोहित टीम बदलणार?

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)ची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.

  • Share this:

दुबई, 30 सप्टेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)ची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. आतापर्यंत झालेल्या तीन मॅचपैकी एकाच मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला आहे. चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkings) विरुद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्ये मुंबईला पराभव स्वीकारावा लागला, तर कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)विरुद्ध मुंबईने दणदणीत विजय मिळवला. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध अत्यंत रोमांचक अशा सुपर ओव्हरमध्ये मुंबईच्या पदरी निराशा पडली.

पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. पण आतापर्यंत झालेल्या तिन्ही मॅचमध्ये मुंबईचा ओपनर क्विंटन डिकॉक आणि ऑलराऊंडर कृणाल पांड्याला चमक दाखवता आली नाही. क्विंटन डिकॉकने तीन मॅचमध्ये 33, 1 आणि 14 रनची खेळी करता आली.

तर ऑलराऊंडर कृणाल पांड्याने 3 मॅचमध्ये 4 रन केल्या. चेन्नईविरुद्ध कृणाल 3 रन करून माघारी परतला, तर कोलकात्याविरुद्ध त्याने नाबाद 1 रन आणि आरसीबीविरुद्ध शून्य बॉलमध्ये शून्य रनवर कृणाल नाबाद राहिला. बॉलिंगमध्येही कृणालला चमक दाखवता आली नाही. 3 मॅचमध्ये कृणालने 1 विकेट घेतली आहे.

रोहित कोणाला संधी देणार?

मुंबईचा पुढचा सामना 1 ऑक्टोबरला किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) विरुद्ध आहे. या मॅचमध्ये कर्णधार रोहित शर्मा टीममध्ये बदल करण्याची शक्यता कमी असली तरी, त्याच्याकडे क्रिस लीन आणि अनुकूल रॉय हे दोन पर्याय आहेत. क्विंटन डिकॉकच्या ऐवजी रोहित क्रिस लिनला आणि कृणाल पांड्याऐवजी अनुकूल रॉयला संधी देऊ शकतो. क्विंटन डिकॉकऐवजी इशान किशनच्या विकेट कीपिंगचा पर्याय मुंबईकडे उपलब्ध आहे.

मुंबईची टीम

रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, इशान किशन, कृणाल पांड्या, जेम्स पॅटिनसन, ट्रेन्ट बोल्ट, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, सौरभ तिवारी, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, जयंत यादव, शरफेन रदरफोर्ड, क्रिस लिन, नॅथन कुल्टर नाईल, मोहसीन खान, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बलवंत राय सिंह

Published by: Shreyas
First published: September 30, 2020, 8:47 PM IST

ताज्या बातम्या