Home /News /sport /

IPL 2020 : किटसाठीही पैसै नव्हते, वडिल होते ड्रायव्हर, मुलगा आता गाजवतोय आयपीएल

IPL 2020 : किटसाठीही पैसै नव्हते, वडिल होते ड्रायव्हर, मुलगा आता गाजवतोय आयपीएल

IPL 2020 शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Superkings) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)यांच्यात झालेल्या मॅचमध्ये क्रिकेट रसिकांना नवीन स्टार बघायला मिळाला.

    दुबई, 3 ऑक्टोबर : शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Superkings) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)यांच्यात झालेल्या मॅचमध्ये क्रिकेट रसिकांना नवीन स्टार बघायला मिळाला. हैदराबादचा युवा बॅट्समन प्रियम गर्ग (Priyam Garg)ने या मॅचमध्ये धमाकेदार अर्धशतक केलं. प्रियमने चेन्नईच्या अनुभवी टीमसमोर खेळताना 26 बॉलमध्ये 51 रन केले. महत्त्वाच म्हणजे हैदराबादचे दिग्गज खेळाडू मैदानात परतल्यानंतर प्रियमने ही खेळी केली. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार राहिलेल्या प्रियम गर्गचा क्रिकेटच्या मैदानावर यायचा प्रवास बराच कठीण होता. प्रियमच्या संघर्षाची ही कहाणी ऐकून तुम्हीही भावुक व्हाल. प्रियम गर्ग उत्तर प्रदेशच्या मेरठपासून 25 किमी लांब असलेल्या किल्ला परिक्षितगडचा आहे. प्रियम 11 वर्षांचा असतानाच त्याच्या आईचं निधन झालं होतं. मुलानं क्रिकेटपटून व्हावं, असं त्याच्या आईचं स्वप्न होतं. मुलानेही आईचं हे स्वप्न पूर्ण केलं, पण दुर्दैवाने प्रियमचं हे यश बघायला त्याची आई या जगात नाही. 2011 साली आईच्या मृत्यूनंतर प्रियमने तिचं स्वप्न साकार करण्यासाठी कठोर मेहनत केली. रोज अभ्यासासोबतच तो 7-8 तास नेट प्रॅक्टिसही करायचा. या मेहनतीचं फळ प्रियमला 7 वर्षानंतर मिळालं. उत्तर प्रदेशच्या रणजी टीममध्ये त्याची 2018 साली निवड झाली. प्रियमचे वडिल नरेश गर्ग घराचा खर्च भागवण्यासाठी शाळेची व्हॅन चालवायचे. प्रियमला 5 बहिण-भाऊ आहेत. कुटुंब मोठं असल्यामुळे वडिलांना घर चालवणं कठीण होतं, असं असलं तरी त्यांनी प्रियमच्या क्रिकेटमध्ये कोणतीही कमी पडू दिली नाही. प्रियमला क्रिकेट किट विकत घेण्यासाठीही पैसे नव्हते, तेव्हा वडिलांनी मित्राकडून पैसे उधार घेतले. वयाच्या 6व्या वर्षापासून प्रियमला त्याचे वडिल क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी पाठवू लागले. प्रियमच्या वडिलांच्या मेहनतीला आता यश यायला लागलं आहे. प्रियमची क्रिकेट कारकिर्द - 2018-19 साली रणजी पदार्पणातच प्रियमने 800 पेक्षा जास्त रन केले. - गोव्याविरुद्ध पदार्पणाच्या मॅचमध्येच त्याने शतक केलं. - 2018-19 च्या रणजी मोसमात प्रियमने 67.83च्या सरासरीने 2 शतकं आणि 4 अर्धशतकं केली. - मागच्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये प्रियम गर्गने भारताला फायनलमध्ये पोहोचवलं. - मागच्या वर्षी सनरायजर्स हैदराबादने त्याला 1.9 कोटी रुपयांना विकत घेतलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या