IPL 2020 : राहुल द्रविडचा शिष्य प्रियम गर्गचं अर्धशतक, धोनीही बघत बसला

IPL 2020 : राहुल द्रविडचा शिष्य प्रियम गर्गचं अर्धशतक, धोनीही बघत बसला

आयपीएल (IPL 2020) प्रियम गर्ग (Priyam Garg) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) या दोन नवख्या खेळाडूंनी चेन्नई (Chennai Superkings)च्या अनुभवासमोर टिच्चून बॅटिंग करत हैदराबाद (Sunrisers Hyderabad) ला सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवलं आहे.

  • Share this:

दुबई, 2 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) प्रियम गर्ग (Priyam Garg) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) या दोन नवख्या खेळाडूंनी चेन्नई (Chennai Superkings)च्या अनुभवासमोर टिच्चून बॅटिंग करत हैदराबाद (Sunrisers Hyderabad) ला सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवलं आहे. प्रियम गर्गने 26 बॉलमध्ये नाबाद 51 रन तर अभिषेक शर्माने 24 बॉलमध्ये 31 रन केले. यामुळे हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 164 रनपर्यंत मजल मारली. या मॅचमध्ये हैदराबादने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण याचा फायदा त्यांना करुन घेता आला नाही. ओपनर जॉनी बेयरस्टो शून्य रनवर माघारी परतला.

बेयरस्टोच्या विकेटनंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडे यांनी हैदराबादचा डाव सावरायला सुरुवात केली. पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. डेव्हिड वॉर्नर 28 रनवर आणि मनिष पांडे 29 रनवर आऊट झाले. तर केन विलियमसनही 9 रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला. हैदराबादची अवस्था 69/4 अशी झाली असताना त्यांना मोठ्या स्कोअरपर्यंत जाता येणार नाही, असंच वाटत होतं. पण गर्ग आणि शर्मा यांच्यात 77 रनची पार्टनरशीप झाली. चेन्नईकडून सॅम करन आणि शार्दुल ठाकूरला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम शेवटच्या म्हणजेच 8व्या क्रमांकावर आणि हैदराबादची टीम 7व्या क्रमांकावर आहे. चेन्नई आणि हैदराबाद या दोन्ही टीमचा प्रत्येकी 1 मॅचमध्ये विजय आणि 2 मॅचमध्ये पराभव झाला आहे. पण हैदराबादचा नेट रनरेट चेन्नईपेक्षा चांगला असल्यामुळे ते पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईच्या पुढे आहेत.

Published by: Shreyas
First published: October 2, 2020, 9:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या