IPL 2020 : पंजाब बाहेर झाल्यानंतर प्रीती झिंटा झाली भावुक, म्हणाली...

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमातही पंजाब (KXIP)च्या टीमच्या पदरी निराशा आली. पंजाब प्ले-ऑफमधून बाहेर झाल्यानंतर टीमची मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta)ने ट्विटरवर खास संदेश लिहिला.

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमातही पंजाब (KXIP)च्या टीमच्या पदरी निराशा आली. पंजाब प्ले-ऑफमधून बाहेर झाल्यानंतर टीमची मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta)ने ट्विटरवर खास संदेश लिहिला.

  • Share this:
    दुबई, 5 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमातही पंजाब (KXIP)च्या टीमच्या पदरी निराशा आली. शेवटच्या मॅचमध्ये पराभव झाल्यामुळे पंजाबचं प्ले-ऑफ गाठण्याचं स्वप्न भंगलं. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बँगलोर या चार टीमनी प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला. तर चेन्नई, पंजाब, कोलकाता आणि राजस्थान यांचं आव्हान लीग स्टेजमध्येच संपुष्टात आलं. या मोसमात कामगिरीत सगळ्यात जास्त चढ उतार पंजाबच्या टीमने बघितले. पंजाब प्ले-ऑफमधून बाहेर झाल्यानंतर टीमची मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta)ने ट्विटरवर खास संदेश लिहिला. प्रीतीचं भावुक ट्विट प्रीतीने ट्विटरवर टीमचे आणि आपले फोटो शेयर केले. 'आयपीएल आणि युएईला अलविदा म्हणायची वेळ आली आहे. हा मोसम जशी अपेक्षा होती, तसा गेला नाही. पण आम्ही आणखी चांगले आणि आणखी मजबूत बनून पुढच्या वर्षी येऊ. अनेक रोमांचक सामने, हृदयाचे ठोके चुकवणारे आणि कायम लक्षात राहतील असे क्षण आम्हाला इकडे मिळाले. हा प्रवास एवढा लांबचा नव्हता. मी पंजाबच्या चाहत्यांना धन्यवाद देते. कठीण काळातही ते आमच्यासोबत उभे राहिले. तुम्ही सगळे आमच्यासाठी महत्त्वाचे आहात,' असं ट्विट प्रीतीने केलं. पंजाबची टीम यावर्षी केएल राहुल (KL Rahul)च्या नेतृत्वात मैदानात उतरली होती. टीमला पहिल्या 7 मॅचपैकी एकाच मॅचमध्ये विजय मिळाला होता, त्यामुळे ते पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर होते. यानंतर त्यांची पुढची मॅच मुंबईविरुद्ध झाली. क्रिस गेलच्या पुनरागमनासोबतच त्याने डबल सुपर ओव्हरमध्ये पंजाबला जिंकवून दिलं. यानंतर पंजाबचं नशीब पलटलं आणि त्यांनी लागोपाठ 5 मॅच जिंकल्या. पण लीगमधली शेवटची मॅच हरल्यामुळे त्यांना प्ले-ऑफमध्ये जागा मिळाली नाही.
    Published by:Shreyas
    First published: