Home /News /sport /

IPL 2020 : महामुकाबल्याआधी चाहत्यांना भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनलची आठवण

IPL 2020 : महामुकाबल्याआधी चाहत्यांना भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनलची आठवण

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमातल्या फायनलमध्ये मुंबई (Mumbai Indians)चा सामना दिल्ली (Delhi Capitals)विरुद्ध होणार आहे. त्याआधी दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Pointing) यांच्यावर सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात मीम व्हायरल होत आहेत.

पुढे वाचा ...
    दुबई, 10 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमातल्या फायनलमध्ये मुंबई (Mumbai Indians)चा सामना दिल्ली (Delhi Capitals)विरुद्ध होणार आहे. रविवारी झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीने हैदराबाद (SRH)ला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Pointing) यांच्यावर सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात मीम व्हायरल होत आहेत. यामध्ये 2003 च्या वर्ल्ड कपमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सामन्याबरोबर आयपीएलच्या फायनलची तुलना होत आहे. 2003च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये रिकी पाँटिंगच्या 140 धावांमुळे 23 मार्च 2003 ला सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमला फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता मुंबईविरुद्ध रिकी पाँटिंग मार्गदर्शक असलेला दिल्लीची टीम भिडणार आहे. दिल्लीने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. एकाने पाँटिंगविरुद्ध तेंडुलकर सामना रंगणार असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने पाँटिंगविरुद्ध झहीर खानमध्ये सामना रंगणार असल्याचं सांगितलं आहे. तर दुसऱ्याने 2003 ची फायनल पुन्हा एकदा रंगणार असल्याचं म्हटलं आहे. याआधी कोरोना लॉकडाऊनमध्ये 23 मार्च 2020 ला पाँटिंगने 2003 च्या फायनामधील बॅटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या पोस्टमध्ये त्यानी लिहिलं होतं, घरी राहिल्याने आपल्या सर्वांना थोडा वेळ मिळाला आहे, त्यामुळे मी माझ्या कारकीर्दीत जे काही मिळवलं आहे, त्याचे काही फोटो तुमच्याबरोबर शेअर करत आहे. ही बॅट मी 2003 वर्ल्ड कप फायनलमध्ये वापरली होती. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्लीने हैदराबादला 17 धावांनी पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मार्कस स्टोयनिसच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर आणि शिखर धवन याच्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे दिल्लीने या सामन्यात विजय मिळवला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या