Home /News /sport /

IPL 2020 Playoff : मुंबईचं प्लेऑफमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित, आता 3 जागांसाठी 6 संघ भिडणार

IPL 2020 Playoff : मुंबईचं प्लेऑफमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित, आता 3 जागांसाठी 6 संघ भिडणार

IPL 2020 Playoff Scenario : मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) प्लेऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित झाले आहे. आता उर्वरित 3 जागांसाठी सहा टीम्समध्ये चुरस असेल. जाणून घेऊया प्लेऑफचे समीकरण...

    मुंबई, 29 ऑक्टोबर : आयपीएल टी-20 (IPL 2020) क्रिकेट स्पर्धेत सध्या प्लेऑफची चुरस वाढली आहे. साखळी फेरीचे काही सामने शिल्लक असले तरीदेखील अजूनही एकाही संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केलेला नाही. सध्या 48 सामने पूर्ण झाले असून  संघांनी प्रत्येकी 12 सामने खेळले आहेत. त्यामुळे सर्व संघांचे दोन सामने बाकी असून यामध्ये कोण प्लेऑफमध्ये जाणार याचा निर्णय होणार आहे. सध्या पॉईंट टेबलमध्ये मुंबई अव्वल क्रमांकावर असून त्यांचे प्लेऑफमधील स्थान जवळपास नक्की आहे. त्याचप्रमाणे चेन्नईचा संघ प्लेऑफबाहेर पडला आहे. त्यामुळे उर्वरित तीन जागांसाठी सहा संघांमध्ये स्पर्धा असेल. त्यामुळे यावर्षीचे आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे समीकरण समजून घेऊ. मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये नक्की मॅच -12, गुण- 16 मुंबई इंडियन्स 12 सामन्यांत 16 पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर त्यांचा रनरेटदेखील प्लसमध्ये आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये मुंबईचा प्रवेश नक्की असून पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर ते राहण्याची शक्यता आहे. शिल्लक सामने : दिल्ली कॅपिटल्स , सनराइजर्स हैदराबाद आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचणार? मॅच -12, गुण- 14 विराट कोहलीच्या आरसीबीचा (RCB) प्लेऑफमधील प्रवेश देखील नक्की मानला जात आहे. बुधवारच्या मुंबईविरुद्ध पराभव झाल्यानंतर देखील आरसीबीचा प्रवेश नक्की आहे. त्यामुळे उर्वरित दोनपैकी एका सामन्यात संघाला विजय मिळवणे गरजेचं आहे. जर दोन्हीही सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला तर गणित बिघडू शकते. त्यामुळे दुसऱ्या संघाच्या सामन्यांवर त्यांना अवलंबून राहावे लागेल शिल्लक सामने : दिल्ली कॅपिटल्स , सनराइजर्स हैदराबाद दिल्ली कॅपिटल सध्या तिसऱ्या क्रमांकावर मॅच -12, गुण- 14 सनराइजर्स हैदराबादकडून पराभव झाल्यानंतर दिल्लीची गाडी अडकली आहे. त्यांचे उर्वरित सामने हे पॉईंट्स टेबलवरील टॉपच्या संघाविरुद्ध खेळायचे आहेत. त्यामुळे सध्या 14 पॉइंट्स असल्याने त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असल्यास एक सामना तरी जिंकावा लागणार आहे. 14 पॉइंट्ससह ते प्लेऑफमध्ये जाऊ शकतात. पण त्यांना इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल. शिल्लक सामने : मुंबई इंडियन्स, आरसीबी किंग्स इलेव्हन पंजाबची विजयी घौडदौड मॅच -12, गुण- 12 सलग पाच सामन्यांत विजय मिळवून पंजाबने पॉईंट टेबलमध्ये मोठी उडी मारली आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामने जिंकून प्लेऑफमध्ये जाण्याची पंजाबकडे संधी आहे. पंजाबचा रनरेटदेखील उत्तम असून पाचव्या क्रमांकावरील कोलकात्यापेक्षा त्यांचा रनरेट चांगला आहे. त्यामुळे एका सामन्यात पराभव झाल्यास देखील त्यांना प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. पण इतर संघाच्या निकालावर त्यांचं देखील गणित अवलंबून असणार आहे. शिल्लक सामने : राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स कोलकाता नाइट रायडर्सला दोन्ही सामने जिंकणं आवश्यक मॅच -12, गुण- 12 कोलकात्याला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी उर्वरित दोन्ही सामन्यांत विजय मिळवणं गरजेचं आहे. कोलकात्याचा रनरेट कमी असल्याने त्यांना दोन्ही सामन्यांत मोठ्या फरकाने जिंकणे गरजेचं आहे. एका सामन्यात पराभव झाल्यास देखील त्यांना प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळू शकते. पण इतर संघाच्या निकालावर त्यांचं गणित अधिक प्रमाणात अवलंबून असेल. शिल्लक सामने : चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स सनराइजर्स हैदराबादला दोन्ही सामने जिंकणं आवश्यक मॅच -12, गुण- 10 सनराइजर्स हैदराबादला उर्वरित दोन्ही सामन्यांत विजय मिळवावा लागणार आहे. त्याचबरोबर उर्वरित पाचपैकी दोन संघ 16 गुणांपर्यंत पोहोचू नयेत यासाठी देखील प्रार्थना करावी लागणार आहे. शिल्लक सामने : आरसीबी, मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स मॅच -12, गुण- 10 उर्वरित दोन सामने जिंकल्यानंतर देखील राजस्थानसाठी प्लेऑफचा मार्ग अवघड आहे. खराब रनरेटमुळे त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश अधांतरी आहे. शिल्लक सामने : किंग्स इलेव्हन पंजाब, केकेआर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: IPL 2020

    पुढील बातम्या